बंगळुरू 13 मे : कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. भाजपला कर्नाटकमध्ये मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांना इथे पराभवाला सामोरे जावं लागत असल्याचं चित्र आतापर्यंत दिसत आहे. अशातच आता शरद पवार यांनी या निकालावर प्रतिक्रिया देत भाजपवर सडकून टीका केली आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले, की कर्नाटकमध्ये जवळपास दुपट्ट जागांवर काँग्रेसला यश मिळत आहे. सत्तेचा गैरवापर केल्यानं भाजपचा परभाव झाला आहे. शरद पवारांनी कर्नाटकातील यशासाठी काँग्रेसचं अभिननंदन केलं आहे. तसंच खोक्यांचं राजकारण लोकांना नापसंत असल्याचं म्हणत भाजपवर टीका केली आहे. मोदी, शाहांनी सभा घेऊन आणि भाजपचे नेते कर्नाटकात तळ ठोकून असतानाही भाजपचा पराभव झाला. त्यामुळे भावनात्मक लोकांना राजकारण चालत नाही, असंही ते म्हणाले. Karnataka Election Results 2023 Live Updates : काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू, दोन्ही नेत्यांना दिल्लीला बोलावलं फोडाफो़डीचं राजकारण भाजपकडून होऊ शकतं का? असा सवाल त्यांना करण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, की भाजपला फोडाफोडी करण्याची सवय आहे. मात्र यावेळी जनतेनंच खबरदारी घेतली आहे की फोडाफोडीचं राजकारण होऊ नये. दुपट्ट जागांवर काँग्रेसला यश मिळालं आहे. पुढे ते म्हणाले, की राहुल गांधींच्या भारत जोडोचा कर्नाटकात उपयोग झालाय असं दिसतंय. पण मी अजून खोलात गेलो नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार पिछाडीवर असल्याचंही त्यांनी मान्य केलं. कर्नाटकसारखा कौल महाराष्ट्रात पाहायला मिळेल का? असं विचारलं असता, ते म्हणाले की लोकांना इथेही बदल हवा आहे. तो पुढच्या निवडणुकीमध्ये दिसेल. महाविकास आघाडीतील पक्ष वेगळे लढले तर भाजपला हरवू शकतील का? असा सवाल केला असता ते म्हणाले, की हे माहिती असताना वेगळं का लढायचं? यातूनच त्यांनी संकेत दिले की महाविकासआघाडी आता महाराष्ट्रात भाजपला हरवण्यासाठी एकत्र येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.