नवी दिल्ली, 28 मार्च : राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटले. उद्धव ठाकरेंनी सावरकरांचा अपमान खपवून घेणार नसल्याचं विधान केलं. तसंच ठाकरेंच्या शिवसेनेने याच मुद्द्यावरून विरोधकांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. या वादामुळे महाविकासआघाडीमध्ये बिघाडी झालेली असतानाच शरद पवार पुन्हा एकदा संकटमोचक ठरले आहेत. ठाकरेंच्या पक्षानं राहुल गांधींच्या वक्तव्यावर जाहीर अक्षेप घेतला होता. त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्यापूर्वीचं शरद पवारांनी त्यामध्ये मध्यस्थी करीत वाद मिटवला. महाविकास आघाडी वाचविण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची लोकसभा खासदार रद्द नंतर देशातील राजकरण चांगलच तापलं आहे. मोदी नावावर टीका केल्यानंतर राहुल गांधी यांना सुरत न्यायलयाने 2 वर्षाची शिक्षा ठोठावताच लोकसभा अध्यक्षाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. राहुल यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी अधिकच आक्रमक झाले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अडाणी यांचे संबंध काय आणि 24 हजार कोटी कसे दिले? असे अनेक प्रश्न आक्रमकतेने विचारले. राहुल गांधी यांनी माफी का मागितली नाही यावर गांधी यांनी स्पष्ट केलं, की मी सावरकर नाही मी गांधी आहे, त्यामूळे मी माफी मागणार नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना पक्षाची अडचण झाली. उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत सावरकर विषयी थेट भूमिका मांडून राहुल गांधी यांना थेट इशार ही दिला. याच प्रकरणात आता शरद पवार यांनी महाविकास आघाडी वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे . शरद पवार यांनी सावरकर यांना माफीवीर म्हणू नये अशी भूमिका मांडली . काँग्रेस नेते राहुल गांधींच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील महाविकास आघाडी मतभेदाची ठिणगी पडली होती. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरें पक्षानं केवळ उघडपणे नाराजी व्यक्ती होती असं नाही. तर उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना थेट इशारा दिला होता.
राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केल्यामुळे राज्यातील सत्ताधारी भाजप- शिवसेनेला ठाकरेंच्या पक्षावर टीका करण्याची आयतीचं संधी मिळालीय. सोमवारी खुद्द मुख्यमंत्र्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.तर भाजपनं राज्यभर सावरकर गौरव यात्रेची घोषणा करून टाकलीय. सत्ताधारी भाजप-शिवसेनेनं सावरकरांच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ठाकरेंच्या पक्षाची चांगलीचं कोंडी झाली होती. गेल्या काही दिवसात हा वाद चांगलाच पेटलाय, त्यामुळे सावरकरांवरून आघाडीत बिघाडीचे सूर उमटू लागताचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा मदतीला धावून आले. सोमवारी दिल्लीत झालेल्या देशातील 18 पक्षांच्या बैठकीत शरद पवारांनी हा मुद्दा मांडला. तसंच सावरकरांना माफीवीर म्हणणं अयोग्य असल्याची भूमिका मांडली. विषेश म्हणजे राहुल गांधींनी सावरकरांवर बोलणं टाळावं, असं मत काही काँग्रेस खासदारांनी व्यक्त केलं.