ठाणे, 11 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणाबाबत खंत व्यक्त केली आहे. आता राजकारणात मैत्री संपली आहे, फक्त स्पर्धा राहिली आहे, अशी उद्वीग्न प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे. हे सांगतांना जितेंद्र आव्हाड यांनी एक जुनी आठवण सांगितली. शरद पवारांनी मदत केली नसती तर आनंद दिघे यांच्यावरील टाडा रद्द झाला नसता, असं आव्हाड म्हणाले आहेत.
आनंद दिघे यांना जामीन देण्यासाठी शरद पवारांनी मदत केली, हा ठाण्याचा इतिहास आहे. शरद पवारांनी ठरवलं असतं तर आनंद दिघे टाडाच्या बाहेरच आले नसते. त्यांची जेव्हा सुरक्षा काढली तेव्हा पद्मसिंह पाटील गृहमंत्री होते, तेव्हा आनंद दिघेंनी माझी सुरक्षा काढू नका म्हणून विनंती केली होती. दुसऱ्या दिवशी आनंद दिघेंना होती तशीच सुरक्षा व्यवस्था परत देण्यात आली. याच्यासाठी मोठं मन आणि मोठा अनुभव लागतो, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
'समृद्धी'च्या लोकार्पणात मतभेदांचे ब्रेक! भर कार्यक्रमात भाजप-शिंदे गटात काय झालं?
असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. दोस्त दोस्त ना रहा, असं आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले. ठाण्यातल्या मैत्रीतील राजकारण संपलं आहे, आता राजकारणात मैत्री संपली फक्त स्पर्धा राहिली आहे, अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली.
'ठाण्यातल्या राजकारणात कधीही महिलांचा उपयोग करून राजकारण केलं जात नव्हतं, पण ते करून दाखवलं या प्रकारामुळे जनतादेखील नाराज आहे,' असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 'मुख्यमंत्र्यांनी मन मोठं करून जेवढ्या जणांना जवळ करता येईल तेवढं जवळ करावं, असं मी पहिल्या भाषणात म्हणालो होतो, पण ते दुर्दैवाने जेवढं लांब करता येईल तितकं लांब करत आहेत,' अशी टीका आव्हाडांनी केली.
आधी मिंध्याचे नेते हे बाळासाहेब होते आता...., शिंदेंच्या भाषणाचं उद्धव ठाकरेंकडून पोस्टमॉर्टेम
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jitendra awhad, Sharad Pawar