शिर्डी, 11 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजनासाठी आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाच्या टप्प्याचं लोकार्पण केलं. पण या लोकार्पण सोहळ्यात भाजप आणि शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप खासदार सुजय विखे पाटील तसंच शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. अहमदनगरमधल्या समृद्धी महामार्गाच्या कोकमठाणच्या इंटरचेंज येथून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा दाखवण्यात आला. आधी मिंध्याचे नेते हे बाळासाहेब होते आता…., शिंदेंच्या भाषणाचं उद्धव ठाकरेंकडून पोस्टमॉर्टेम या सोहळ्यात बोलताना राधाकृष्ण विखे पाटील आणि सदाशीव लोखंडे यांनी एकमेकांना सल्ले दिले. ‘ड्राय भागात आम्हाला मोठी संधी होती, मात्र या बागायती भागात सगळं अवघड आहे. इथे सगळे कारखानदार असल्यामुळे आम्ही पेरलेलं उगवत नाही. याआधी महाविकासआघाडी सत्तेत असताना बाळासाहेब थोरात यांचं ऐकावं लागायचं. 2014 ला विखे विरोधात होते, त्यानंतर 2019 ला ते जवळ आले, यापुढे आपण एकत्र काम केलं पाहिजे,’ असं सदाशिव लोखंडे म्हणाले. लोखंडेंच्या या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर भाषणातूनच प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही युतीत नसताना तुमचं काम केलं आहे. लोखंडे साहेब चिंता करू नका, आपल्या जिल्ह्याची समृद्धी कशी येईल हे काम आपण करूया. आपल्या भोवतालचे कार्यकर्ते काहीही सांगतात, मात्र आपण आपले कान पक्के ठेवले पाहिजेत,’ असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. ‘शॉर्टकटचे राजकारण करू नका’ पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.