मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बुलडाण्यात सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच उचललं टोकाचं पाऊल

बुलडाण्यात सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच उचललं टोकाचं पाऊल

पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली असता, तिच्या चुलत भावानं बळजबरी करत तिच्यावर बलात्कार केला आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली असता, तिच्या चुलत भावानं बळजबरी करत तिच्यावर बलात्कार केला आहे.

Crime in Buldhana: बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र बापानं (Stepfather) अल्पवयीन मुलीचा (Minor girl) विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

खामगाव, 21 जुलै: बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र बापानं (Stepfather) अल्पवयीन मुलीचा (Minor girl) विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीनं आपल्या सावत्र वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. आरोपीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकीकडे सावत्र मुलीचा विनयभंग आणि दुसरीकडे आरोपी वडिलांची आत्महत्या (Accused commits suicide) या दुहेरी घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही घटनांचा एकत्रित तपास केला जात आहे.

खरंतर, 55 वर्षीय आरोपीनं यापूर्वीही आपल्या 14 वर्षीय सावत्र मुलीचा विनयभंग केला होता. तेव्हा आरोपी सात दिवस फरार झाला होता. दरम्यान त्यानं पुन्हा एकदा आपल्या मुलीचा विनयभंग केला. यामुळे पीडित मुलीनं आपल्या सावत्र वडिलांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी रविवारी 55 वर्षीय सावत्र बापाविरोधात बाल लैंगिक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आरोपीच्या शोधात असतानाच, आरोपी वडिलांनी जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत गळफास लावून आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.

हेही वाचा-'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत विकृत कृत्य; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्..

ही खळबळजनक घटना उघडकीस येताच, मृताच्या नातेवाईकांत आणि तक्रारदार मायलेकीत चांगलाचं वाद उफळला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमधील वाद मिटवला आहे. पोलिसांनी आरोपी व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

हेही वाचा-नाशकात मित्राकडूनच घात,अल्पवयीन मुलीला फिरायला नेलं अन् गुंगीचं औषध देत अत्याचार

आरोपीनं यापूर्वीही आपल्या सावत्र मुलीचा विनयभंग केला होता. त्यावेळी तो तब्बल सात दिवस घराबाहेर होता. दरम्यान त्यानं पुन्हा आपल्या मुलीचा विनयभंग केला. त्यामुळे पोलिसांनी याची गांभीर्यानं दखल घेत आरोपीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी रविवारी शोध मोहिम थांबवली होती. पण आरोपीनं मंगळवारी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. आरोपीनं चुकीच्या आरोपांमुळे आत्महत्या केली की पश्चातापातून याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Buldhana news, Crime news, Daughter, Father, Sexual assault, Sexual harassment, Sexual offences