Home /News /maharashtra /

धक्कादायक! 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्...

धक्कादायक! 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्...

या संशोधनानुसार महिला पुरषांकडे भावनिक आकर्षणाने (Emotional Attraction) पाहतात. त्याउलट पुरुष महिलांकडे शारीरिकरित्या (Physically) आकर्षिले जातात. यासंदर्भात याआधीही काही संशोधन झालेले आहेत. संशोधक डॉक्टर स्टीफन व्हाइट (Dr.Stephen White)यांच्यामते वयानुसार पुरुष आणि महिलांच्या गरजा बदलायला लागतात.

या संशोधनानुसार महिला पुरषांकडे भावनिक आकर्षणाने (Emotional Attraction) पाहतात. त्याउलट पुरुष महिलांकडे शारीरिकरित्या (Physically) आकर्षिले जातात. यासंदर्भात याआधीही काही संशोधन झालेले आहेत. संशोधक डॉक्टर स्टीफन व्हाइट (Dr.Stephen White)यांच्यामते वयानुसार पुरुष आणि महिलांच्या गरजा बदलायला लागतात.

Murder in Gondia: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्या तरुणीची तिच्याच प्रियकारनं मित्रांच्या मदतीनं हत्या (Boyfriend Killed Girlfriend) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    गोंदिया, 20 जुलै: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्या तरुणीची तिच्याच प्रियकारनं मित्रांच्या मदतीनं हत्या (Boyfriend Killed Girlfriend) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येच्या घटनेनंतर, पोलिसांनी एक महिन्यानं खूनाची उकल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य दोघांना अटक केली आहे. आरोपींनी मृत तरुणीला जंगलात नेवून तिची निर्घृण हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास चिचगड पोलीस करत आहेत. खरंतर, 23 जून रोजी गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढासगड याठिकाणी एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला होता. आरोपींनी गळ्यावर, डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करत तिची हत्या केल्याचं उघड झालं होतं. पण संबंधित तरुणी नेमकी कोण आणि तिची हत्या कोणी केलं, याच गूढ बनलं होतं. पोलिसांनी मृत तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तरुणीची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी तपास करत प्रियकरासह दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हेही वाचा-लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा पोलीस स्टेशनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा समीर असलम शेख (वय 26, बावलानगर बुटीबोरी) असं अटक केलेल्या प्रियकर तरुणाचं नाव आहे. तर आसिफ शेरखान पठाण (वय 35) आणि प्रफुल पांडुरंग शिवणकर (वय 25) असं अटक केलेल्या अन्य दोन तरुणांची नावं आहे. आरोपी समीर हा मागील काही काळापासून मृत तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. दरम्यान मृत तरुणीनं समीरकडे लग्नाचा तगादा लावला. पण समीरला लग्न करायचं नव्हतं. हेही वाचा-लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा पोलीस स्टेशनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा असा काढला काटा... प्रेयसीनं लग्नाचा तगादा लावल्यानं संतापलेल्या समीरनं प्रेयसीचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी त्यानं मित्र आसिफ आणि प्रफुल या दोघांशी संगनमत केलं. यानंतर आरोपी प्रियकरानं फिरण्याच्या बहाण्यानं प्रेयसीला ढासगड येथील जंगलात नेलं. याठिकाणी आरोपीनं आपल्या मित्रांच्या मदतीनं प्रेयसीवर धारदार शस्त्रानं वार केले. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीचा मृतदेह जंगलात ओढून नेऊन टाकला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bhandara Gondiya, Crime news, Murder Mystery

    पुढील बातम्या