मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संजय राठोडांवर पुन्हा धक्कादायक आरोप; लैंगिक छळ केल्या प्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार

संजय राठोडांवर पुन्हा धक्कादायक आरोप; लैंगिक छळ केल्या प्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार

संजय राठोड यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

संजय राठोड यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

संजय राठोड यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 12 ऑगस्ट : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणातील आरोपी शिवसेना आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या संकटात आणखी वाढ होत असल्याचं दिसत आहे. पूजा चव्हाण प्रकरणात समोर आलेले ऑडिओ रेकॉर्डिंग, काही छायाचित्र यामुळे संजय राठोड गोत्यात सापडले होते. यानंतर त्यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात धक्कादायक आरोप केला जात आहे.

शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका महिलेने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही, तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत माझा लैंगिक छळ करतात असं ही त्यात म्हटलं आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.

हे ही वाचा-Big News : नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे. (Sexual harassment allegations against Sanjay Rathore) पूजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार आणि राठोडांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर राज्य सरकारला राठोडांचा राजीनामा घ्यावा लागला होता. आता पुन्हा एकदा चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट सोशल मीडियावर याबाबत जाब विचारला आहे.

पोलिसांना याबाबत तक्रार करण्यात आली असली तरी अद्याप पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

First published:

Tags: Chitra wagh, Sanjay rathod, Shivsena, Yavatmal