मराठी बातम्या /बातम्या /nashik /

Big News : नाशिक जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

Big News : नाशिक जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

वैशाली झनकर यांना जिल्हा सत्रन्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

वैशाली झनकर यांना जिल्हा सत्रन्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नाशिक, 12 ऑगस्ट : नाशिक जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर (Dr. Vaishali Zankar-Vir) या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. यात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. वैशाली झनकर यांना पोलीस सुरक्षा का देण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ( Nashik Zilla Parishads corrupt education officer escaped )

दरम्यान वैशाली झनकर यांचं माहेर इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावात तर आगासखिंड गावात सासरचं घर आणि शिक्षण संस्था असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी आता ACB चं धाडसत्र सुरू झालं आहे. झनकर यांच्यां नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात जमिनी आणि स्थावर  मालमत्ता असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. वैशाली झनकर वीर यांच्यांशी संबंधित असणाऱ्या मालमत्तेची चौकशी सुरू करण्यात आली असून त्याचा कुठे कुठे सहभाग आहे याबाबतचा तपास सुरू झाला आहे.

हे ही वाचा-LIVE VIDEO: नाशकात पोलिसांसमोरच तुंबळ हाणामारी आणि दगडफेक

झनकरांची लाखोंची संपत्ती

बुधवारी नाशिकमध्ये (Nashik) 8 लाख रुपयांची लाच (8 Lakh Bribe) स्वीकारल्या प्रकरणी एका महिला शिक्षणाधिकाऱ्याला अटक (Woman education officer arrest ) करण्यात आली होती. झनकर यांच्या नावावर शहरातील शिवाजीनगर भागात, गंगापूररोड, मुरबाड, गंधारे कल्याण असे प्रत्येकी एक याप्रमाणे चार फ्लॅट आहेत. सिन्नरमध्ये 0.57 गुंठे, कल्याण-मिलिंदनगरमध्ये 31.70 गुंठे, 10.8 गुंठे, 40.80 गुंठे, 13.10 गुंठे तर सिन्नर येथे 0.56 गुंठे, 3.41 गुंठे, 22.70 गुंठे, अशी एकूण सुमारे 123.64 गुंठे म्हणजेच सुमारे 3 एकर अशी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. 40 हजारांची रोख रक्कम आढळली असून एक होंडा सिटी कार, एक ॲक्टिवा दुचाकी अशी वाहनं आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण

शाळांना मंजूर करण्यात आलेल्या 20 टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात एका संस्थेकडून 8 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी डॉ. वैशाली झनकर वीर यांना(Dr. Vaishali Zankar-Vir) अटक (Woman education officer arrest ) करण्यात आली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांच्यासह शासकीय वाहनचालक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका शिक्षकाला ताब्यात घेतलं. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई केली.

First published:

Tags: Financial fraud, Nashik