तासाचे हजार आणि रात्रीचे दोन हजार; अपार्टमेंटमधील Sex रॅकेटचा पर्दाफाश

Sex Racket busted: एका इमारतीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली.

Sex Racket busted: एका इमारतीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली.

  • Share this:
    अकोला, 19 जून: अकोला शहरातील (Akola City) एका इमारतीमध्ये सेक्स रॅकेट (Sex Racket) सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी खातरजमा केली आणि त्यानंतर धडक करवाई करत या अपार्टमेंटवर छापा टाकला. अकोला शहरातील मलकापूर परिसरात हे सेक्स रॅकेट सुरू होतं. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर परिसरात असलेल्या साई अपार्टमेंटमधील एका खोलीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. या बनावट ग्राहकाने मग पोलिसांना इशारा केला आणि त्यानंतर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन पाच जणांना ताब्यात घेतलं. पैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले, चार महिन्यांनंतर घडलं असं काही... छापा टाकल्यावर पोलिसांच्या तपासात समोर आले की, या अपार्टमेंटमधील घरमालक आणि त्याची पत्नी या दोघांनी दोन तरुणींना पैशांचे आमिष दाखवत हे कृत्य करण्यासाठी आणले होते. पोलिसांनी ज्यावेळी छापा टाकला त्यावेळी घटनास्थळी दोन मुली, घरमालक, एक महिला आढळून आले. तर एका ग्राहकाने घटनास्थळावरुन पळ काढला. हा व्यक्ती एका ग्राहकाकडून एका तासाला हजार रुपये आणि एका रात्रीसाठी 2 हजार रुपये घेत असे अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकून मोबाइल फोन, पैसे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
    Published by:Sunil Desale
    First published: