पैशांसाठी आई-बाबांसह चौघांची हत्या; मृतदेह घरातच पुरले, चार महिन्यांनंतर घडलं असं काही...

Youth killed 4 including mother father for money: पैशांसाठी वाद विवाद झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल पण पैशासाठी एका तरुणाने आपल्या घरातील चौघांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Youth killed 4 including mother father for money: पैशांसाठी वाद विवाद झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल पण पैशासाठी एका तरुणाने आपल्या घरातील चौघांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • Share this:
    मालदा, 19 जून: पश्चिम बंगालच्या (West Bengal) मालदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका 19 वर्षीय मुलाला घरातील चौघांची हत्या (murder) करुन मृतदेह पुरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कालियाचक पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गुरूटोला गावात ही घटना घडली आहे. पोलीस अधिक्षक आलोक राजोरिया यांनी सांगितले की, आरोपी आसिफ मोहम्मद याचे वडील जावेद अली (50), आई इरा बीबी (45), बहिण आरिफा खातून (17) आणि आजी अलेक्जन बीबी (75) या चौघांचे मृतदेह घरातून ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. भावाने केली पोलखोल ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. जेव्हा आरोपीचा भाऊ आरिफ मोहम्मद (21) याने कालियाचक पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर आरिफ कसाबसा आपला जीव वाचवून पळाला होता. चार महिने तो इतरत्र राहत होता. अखेर चार महिन्यांनी त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. लग्नानंतर मित्राने बोलणं बंद केल्याचा राग; मैत्रिणीने केलं धक्कादायक कृत्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 28 फेब्रुवारीच्या रात्री आपल्या कुटुंबाला कोल्ड ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या. त्यानंतर सर्वजण बेशुद्ध झाले. मग आरोपी आसिफने सर्वांच्या तोंडावर पट्टी बांधली आणि घरातील जलाशयात बुडवले. या सर्वांचा मृत्यू झाल्यावर सर्वांचे मृतदेह घरातील एका खोलीत पुरले. आसिफचा मोठा भाऊ आरिफ याने आपल्या तोंडावरची पट्टी काढली आणि आसिफसोबत झटापट करुन पळ काढला होता. त्यामुळे तो यातून बचावला होता. आफले प्राण वाचवण्यासाठी तो आपले लोकेशन वारंवार बदलत होता. पैशांसाठी हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न प्राथमिक तपासात आरोपी आसिफने आपल्या कुटुंबाकडे पैशाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या घरातून एक टीव्ही सेट, फोन, सीसीटीव्ही कॅमेरा आणि एक लॅपटॉपसह लाको रुपये आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आले आहेत. हत्येमागील नेमकं कारण काय आहे हे याचा तपास पोलीस करत आहेत. या दरम्यानच्या काळात आरोपीने आपल्या शेजाऱ्यांना सांगितले होते की, त्याचे आई-वडिल, बहीण आणि आजी हे सर्वजण कोलकाता येथील फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेले आहेत. आसिफ घरात एकटाच राहत होता आणि तो घरातून बाहेरही पडत नव्हता. केवळ ऑनलाईन डिलिव्हरी घेण्यासाठी तो घराच्या गेटवर येत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगतले.
    Published by:Sunil Desale
    First published: