Home /News /maharashtra /

महाराष्ट्रातील सात अपक्ष आमदार दिल्लीला, खरंच मोठं काहितरी घडतंय?

महाराष्ट्रातील सात अपक्ष आमदार दिल्लीला, खरंच मोठं काहितरी घडतंय?

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारलं असताना महाराष्ट्रातील आणखी सात आमदार हे दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत.

    प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी नवी दिल्ली, 21 जून : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना काही ब्रेक लागताना दिसत नाहीय. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारलं असताना महाराष्ट्रातील आणखी सात आमदार हे दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत. हे सर्व आमदार अपक्ष आमदार असल्याची बातमी समोर येत आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 30 पेक्षा जास्त आमदारांचं समर्थन असल्याची शक्यता आहे. तसेच 4 अपक्ष आमदारांचादेखील शिंदेंनी पाठिंबा आहे. हे आकडे ताजे असताना आता महाराष्ट्रातील आणखी सात आमदार दिल्लीला रवाना झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घडामोडींमुळे महाविकास आघाडी सरकार आणखी अडचणीत आलं आहे. दिल्लीला रवाना झालेल्या या सातही अपक्ष आमदारांची नावे अद्याप फुटलेली नाहीत. पण हे सातही आमदार दुपारी दिल्लीच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे सातही आमदार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. हे सातही आमदार रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास दिल्लीत दाखल होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (एकनाथ शिंदे शिवसेनेत परतण्यास इच्छुक नाहीत, मिलिंद नार्वेकरांच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर) विशेष म्हणजे महाराष्ट्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. दिल्लीत आज सकाळपासून बैठकांचं सत्र सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज जोपर्यंत त्यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी होते तोपर्यंत अनेक नेत्यांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसची एक अत्यंत महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली. त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राच्या दिशेला रवाना झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील सात अपक्ष आमदार हे दिल्लीत दाखल होत आहेत. भाजपला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची असेल तर या अपक्षांना सोबत घेण्याची गरज आहे. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्यात महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडत आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजप सरकार स्थापन करत असेल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील चार ते पाच आमदार भाजपला समर्थन देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच विदर्भातील काही आमदारांचा तर एक गटच तसा निर्माण झाला असल्याची चर्चा राजधानी दिल्लीत सुरु आहेत. वेगवेगळ्या सूत्रांकडून ही सगळी माहिती समोर येत आहे. पण जोपर्यंत कुणी स्पष्टपणे बोलणार नाही तोपर्यंत नेमकं काय घडणार आहे याची खरी माहिती समोर येणार नाही.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या