अकोला, 12 जून : अकोला (akola) जिल्ह्यातील आकोट तालुक्यातील डांगरखेडा या आदिवासी गावातून पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्या बहिण भावाचा (brother and sister drowning) धरणात बूडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने या परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगरखेड येथील आदिवासी केशवराव बेलसरे हे आपल्या शेताची किस्तकाडी पूर्ण करुन रविवारी बाजार आणि बि बियाणे खरेदीकरिता आकोट येथे गेले होते. त्यांच्या मागे त्यांचा 9 वर्षीय मुलगा युवराज आणि 11 वर्षीय मुलगी प्रतिक्षा ही दोघे शेजारच्या मुलीसोबत धरणावर पोहायला गेले होते. युवराज पाण्यात उतरला आणि त्याची बहिण प्रतिक्षा आणि तिची मैत्रिण पाण्याबाहेर होत्या. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पोहताना युवराज बुडत असल्याचे प्रतिक्षाने पाहिले. तीने भावाला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला पण कुणीच जवळ नसल्यामुळे भावाला वाचविण्यासाठी तिने पाण्यात ऊडी घेतली. परंतु दोघांनाही बाहेर पडता येत नव्हते. हे सारे पाहून प्रतिक्षाची मैत्रिण धावतच गावात मदतीसाठी गेली. ( T20 World Cup मध्ये भारताचा हा खेळाडू ठरेल गेम चेंजर! गावसकरांची भविष्यवाणी ) पण लोकाना येण्यास उशीर झाला आणि या चिमुरड्या बहिण-भावाचा करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच पोपटखेड येथिल पांडूरंग तायडे यांचे नेतृत्वात एकलव्य बचाव पथकाने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. ह्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.