मुंबई, 12 जून : टी-20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) फक्त एक खेळाडू मॅचचा निकाल बदलवू शकतो, म्हणूनच अशा खेळाडूंना गेम चेंजर (Game Changer) म्हणलं जातं. प्रत्येक टीम अशा खेळाडूच्या शोधात असते. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियातल्या (Team India) गेम चेंजर खेळाडूचं नाव सांगितलं आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सुनिल गावसकर यांनी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतो, असं भाकीत वर्तवलं आहे. बॅटिंगसोबतच बॉलिंगमध्येही हार्दिक पांड्या कमाल करू शकतो. 7 महिन्यांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून हार्दिकने टीम इंडियात पुनरागमन केलं आहे. ‘हार्दिक पांड्या टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी गेम चेंजर ठरेल. फक्त वर्ल्ड कपच नाही तर भारत जेवढ्या मॅच खेळेल तिकडे त्याची भूमिका महत्त्वाची असेल. तो पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आणि बॉलिंगमध्येही भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरेल. मला हार्दिकला नव्या बॉलने बॉलिंग करतानाही बघायचं आहे,’ असं गावसकर म्हणाले. हार्दिक पांड्याला मागच्या काही काळापासून दुखापतीने ग्रासलं आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिट नसतानाही हार्दिकला खेळवण्यात आलं. पहिल्याच राऊंडमध्ये टीम इंडिया बाहेर झाल्यानंतर खराब कामगिरीचं खापर पांड्यावर फोडण्यात आलं, तसंच त्याला टीमबाहेरही करण्यात आलं. यानंतर हार्दिक थेट आयपीएल खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याने धमाका केला. हार्दिकने आपल्या नेतृत्वात गुजरात टायटन्सना चॅम्पियन बनवलं, तसंच तो गुजरातचा सर्वाधिक रन करणारा खेळाडूही ठरला. या कामगिरीमुळे हार्दिकचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.