जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शाळेत जाणाऱ्या मुलीला टिपरने चिरडले, भावासमोर बहिणीचा मृत्यू

शाळेत जाणाऱ्या मुलीला टिपरने चिरडले, भावासमोर बहिणीचा मृत्यू

या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी टिपर पेटवला.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी टिपर पेटवला.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी टिपर पेटवला.

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदापूर, 30 जुलै : इंदापूर तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माल वाहतूक करणाऱ्या हायवा टिपरने एका 13 वर्षीय शाळकरी मुलीला चिरडल्याची घटना इंदापूर (indapur) तालुक्यातील काटी गावात घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी टिपर पेटवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृप्ती नाना कदम (वय 13 वर्ष) असं मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. तृप्ती आणि तिचा भाऊ गणेश नाना कदम हे दोघे शाळेत जात होते. त्याचवेळी भरधाव वेगात जाणाऱ्या हायवा टिपरने दोघांना धडक दिली. टिपरची धडक बसल्यामुळे तृप्ती कदम या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला असून गणेश नाना कदम (वय 10 वर्ष) या विद्यार्थ्याच्या डोक्यात मार लागला आहे. त्याला तातडीने इंदापूर येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( ‘गुजराती-राजस्थानी लोकांना बाहेर काढलं तर मुंबईची ओळखच उरणार नाही’ -राज्यपाल ) या घटनेमुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलीला चिरडल्यानंतर मद्यधुंद चालकाला जमावाने बेदम चोप दिला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन या चालकाला ताब्यात घेतले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक पलटला; रस्त्यावर भाजीपाल्याचा खच दरम्यान, बीडमध्ये भाजीपाला घेऊन जाणारा भरधाव वेगात जाणार ट्रक भर रस्त्यात पलटला. या अपघातामुळे रस्त्याच्या बाजूला भाजीपाल्याचा खर्च पडला होता. ही अपघाताची घटना बीडच्या धुळे सोलापूर महामार्गावरील कोळवाडी जवळ घडली आहे. कर्नाटकहुन दिल्लीला पत्तागोबी घेऊन जाणारा ट्रक, क्रमांक HR38-U 5083 हा, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर, चालकाचा ताबा सुटल्याने कोळवाडी फाट्यावर डीवायडरवर जाऊन पलटला. या अपघातात ट्रकमधील भाजीपाल्याचा रस्त्याच्या कडेला खच पडला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठं झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात