मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : विद्यार्थ्यांनो सावधान! ‘ही’ चूक कराल तर गमवावी लागेल नोकरी

Video : विद्यार्थ्यांनो सावधान! ‘ही’ चूक कराल तर गमवावी लागेल नोकरी

X
अनेकजण

अनेकजण कागदपत्रे बोगसपणे मिळवून भरती प्रक्रिया पूर्ण करतात. मात्र, हे बोगस प्रमाणपत्र पकडले गेलं तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

अनेकजण कागदपत्रे बोगसपणे मिळवून भरती प्रक्रिया पूर्ण करतात. मात्र, हे बोगस प्रमाणपत्र पकडले गेलं तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 03 डिसेंबर : राज्य सरकारच्या आणि जिल्हा परिषदांच्या विविध भरती प्रक्रियेत शासनाची फसवणूक करून फायदा लाटण्यासाठी बोगस टायपिंग प्रमाणपत्र मिळविण्याचे पेव फुटले आहे. भरती प्रक्रियेत असणाऱ्या अटीमध्ये टायपिंग प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेकजण कागदपत्रे बोगसपणे मिळवून भरती प्रक्रिया पूर्ण करतात. मात्र, हे बोगस प्रमाणपत्र पकडले गेलं तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

बोगस प्रमणपत्र आढल्यास तुमची नोकरी देखील जाऊ शकते. यासाठी विद्यार्थ्यांनी टायपिंग प्रमाणपत्रे हे शासकीय मान्यता प्राप्त इन्स्टिट्यूटमधून टायपिंग शिकून मिळवणे आवश्यक आहे.  मागील काही दिवसांपूर्वी राज्य मंडळाकडे 262 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली असता, यातील तीन कर्मचाऱ्याच्या प्रमाणपत्रावरील माहिती परीक्षा परिषदेतील रजिस्टरमधील माहितीशी विसंगत असल्याचे आढळून आली. त्यामुळे ही प्रमाणपत्रे बोगस असल्याने ती जप्त करण्यात आली व संबंधित तीनही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांनी याची काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा मिळालेली नोकरी देखील जाऊ शकते.

365 दिवस आणि 12 तास भरते 'ही' शाळा! मुलांना हजारपर्यंतचे पाढेही पाठ, Video

नोकरीसाठी टायपिंग प्रमाणपत्र

शासकीय विभागांच्या लेखनिक संवर्गातील नोकरीसाठी टायपिंग प्रमाणपत्र बंधनकारक आहे. परीक्षा परिषदेकडून त्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. शासकीय नोकऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांना संगणक टायपिंग, मॅन्युअल टायपिंगच्या परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट असते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षा घेण्यात येतात. कर्मचारी शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येते. टायपिंग परीक्षेची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्यात येतात.

शेतकऱ्यांच्या मुलांना ऑलिम्पिकसाठी तयार करणारा आधुनिक द्रोणाचार्य, Video

प्रमाणपत्राची तपासणी कशी होते? 

परिषदेकडून संबंधित प्रमाणपत्रावरील सीट नंबर, नाव व अन्य माहिती रजिस्टरमधील माहितीशी जुळते की नाही याची तपासणी केली जाते. त्यानंतर प्रमाणपत्र वैध की अवैध यावर शिक्कामोर्तब केला जातो. 

First published:

Tags: Local18, Satara