सातारा, 15 डिसेंबर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन तोडगा काढला आहे. पण, देशाचे प्रमुख हे पंतप्रधान असतात, त्यांनी दोन्ही राज्यातील पक्षांना बोलावून बैठक घेतली पाहिजे, असं म्हणत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदनयराजे भोसले यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादाच्या मुद्यावर उदयनराजे भोसले यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली आहे. दिल्लीत झालेल्या अमित शहा यांच्या बैठकीवर उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली. ‘केंद्रातले मेन कोण आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान हे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील जनतेचे प्रमुख आहे. सत्तेत असलेले प्रमुख नाही, ज्या ज्या राज्यातील वेगवेगळ पक्ष आहे, त्यांना बोलावले पाहिजे, निमंत्रित केले पाहिजे, आणि सांगावे त्या लोकांची का वाताहात होत आहे. तुमचं राजकारण तुमचं होऊन जातं, आज मला सांगा विकास कुणाचा खुंटतो, प्रगती कुणाची रखडली, सीमा भागातील लोकांची, काय चूक आहे त्या लोकांची, माणुसकीचा विचार केला पाहिजे’ असं म्हणत उदनयराजेंनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला. (अजित पवार निघाले देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला, ‘या’ मुद्यावर होणार चर्चा) ‘एक लक्षात घ्या, त्यावेळी ठरलं होतं काय होतं, भाष्यावर रचना व्हावी, काय झालं, नाही झालं. कॉमनसेन्स आहे. या कॉमनसेन्सला कॉमन का म्हणतात हेच मला कळत नाही. ठीक आहे, देव तर नाही ना, ज्यावेळी महाजन नावाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती, त्यांची लायकी नव्हती. त्यांची बौधिक पात्रता नव्हती किंवा त्यांची इच्छा शक्ती नव्हती’ अशी टीकाही उदनयराजेंनी केली. (INS विक्रांत घोटाळा प्रकरणात सोमय्या पितापुत्रांना क्लिन चिट, मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलं…) ‘भाषावार रचना होण अपेक्षित होत पण झाली नाही. सीमावादावर महाजन समिती बसवली त्याला जमल नाही त्यांची कुवत नव्हती किंवा त्यांची इच्छा शक्ती नव्हती.तुमच्या राजकारणामुळे सीमावर्ती भागातील लोकांची प्रगती खुंटत आहे. या मध्ये पंतप्रधानांनी मध्यस्ती करणे गरजेचे होते, असंही उदनराजे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.