मुंबई, 15 डिसेंबर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर तोडगा काढून परतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिवाळी अधिवेशनाच्या कामाला लागले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विनियोजन बैठकीला बोलावले आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहण्याचे ठरणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार आज दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीला हजर राहणार आहे. विनियोजन बिलबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी भवनातून अजित पवार हे बैठकीला रवाना झाले आहे. विशेष म्हणजे, फडणवीस हे नुकतेच दिल्ली दौरा करून परतले आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये काय चर्चा होते हे महत्त्वाचं ठरणार आहे. (INS विक्रांत घोटाळा प्रकरणात सोमय्या पितापुत्रांना क्लिन चिट, मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलं…) दरम्यान, कारण नसताना कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी वाद निर्माण केला. त्यांनी वक्तव्य केले नसते तर असे झाले नसते. यामुळे जे काही महाराष्ट्र बॉर्डरवर गावात जे मत प्रदर्शित झाले ती भावना पण राज्याच्या दृष्टीने अडचणीत आहे. कर्नाटक समंजस भूमिका घेतली पाहिजे, असंही अजित पवारांनी ठणकावून सांगितलं. ‘समिती नेमली गेल्या. चर्चा झाली, आंदोलन झाली. या आधीही झालं. त्यातून वाद होत राहिले. चर्चा होते तेव्हा काहीतरी सकारात्मक तोडगा निघाला समंजस भूमिका घेतली पाहिजे. हे बसल्यावर चांगल निघावे ही मनापासून भावना आहे. आजपर्यंत अनुभव ,अनेक दिग्गज प्रयत्न केले पण यश आले नव्हते. आधी तोडगा काढायचा प्रयत्न झाला होता. रेल्वे लाईन पलीकडे कर्नाटक आहे. अलीकडचे महाराष्ट्राकडे अशी चर्चा झाली आधी ही चर्चा होऊन बराच काळ होऊन गेला. ही समिती झाली यातून चांगल बाहेर यावे ही अपेक्षा आहे. सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवलं जाईल असे वाटते, असंही अजितदादा म्हणाले. ( Video : महानुभाव पंथही सुषमा अंधारेंच्या विरोधात आक्रमक; मतदान न करण्याची शपथ ) ‘महाविकास आघाडीकडून महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. अशा मोर्चांना पोलीस परवानगी देत नाही. परवानगी दिली नाही तरी मोर्चे काढणारे मोर्चे काढतात.आम्ही परवानगी मागितली नाकारायचा त्याचा अधिकार आहे. तरी आम्ही मोर्चा काढणार आहे. महापुरुष अपमान झाला आहे त्यामुळे आम्ही मोर्चा काढणार आहोत, महापुरुष होणार अपमान, सीमा प्रश्न, महागाईच्या मुद्यासाठी मोर्चा काढणार आहे, असंही अजितदादांनी ठणकावून सांगितलं. नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलवली. कर्नाटक महाराष्ट्र मुख्यमंत्री बैठक झाली. जे ऐकायला मिळाले मराठी माणसाला अडवणूक होणार नाही. हा प्रश्न न्यायालयात आहे. कोर्टात काय निकाल लागतो ते त्यांच्या हातात आहे. आपण पण एक चांगला वकील नेमावा हरीश साळवे नेमणूक करावी, अशी मागणीही अजित पवारांनी केली. ‘आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाला क्लिन चिट मिळाली आहे. सत्ताधारी लोकांना क्लिनचीट मिळत आहे आणि आधी सी समरी दिल्यावर पण केस ओपन होत आहे. हे राजकीय सुड भावनेतून होत असल्याचा वाव आहे, अशी टीकाही अजित पवारांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.