सातारा, 01 नोव्हेंबर : माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गात अज्ञातांनी लोखंडी रॉड ठेवून ट्रेनचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला, दरम्यान हा अज्ञाताकडून ट्रेनचा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न होता की पर्यटकांनी केलेली मस्ती? याबाबत आता शोध सुरू असून मात्र येथील लोको पायलटच्या सतर्कतेमुळे माथेरान मिनी ट्रेनचा अपघात टळला आहे. याबाबत अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत. हे कोणी मुद्दाम केले आहे कि पर्यटकांनी मस्तीने केले आहे यासाठी पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
आपल्या मार्गातील अनेक अडथळे दूर करीत तब्बल तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नुकताच नेरळ माथेरान नेरळ अशी माथेरान टॉय ट्रेन सह्याद्रीच्या पर्वत रांगेतून प्रवासी पर्यटकांच्या सेवेत सुरू झाली.
हे ही वाचा : 16 लाखांचे बक्षीस असलेल्या 2 माओवाद्यांचा खात्मा, जवानांनी मोठी कारवाई
मात्र विकेंडला सायंकाळी माथेरान स्थानकातून नेरळच्या दिशेने सुटली होती. दरम्यान ही ट्रेन 140 नंबरवरील वॉटर पाईपमार्गावर आली. यावेळी रेल्वे रुळावर कोणी अज्ञातांनी लोखंडी रॉड ठेवले होते.
दरम्यान याच मार्गावरून ट्रेन जात होती यावेळी वेळीच लोको पायलट दिपचंद(डीसी) मीना आणि अल्प सुधांशू यांच्या लक्षात येताच. त्यांनी तातडीने ट्रेन थांबवली यामुळे पुढील मोठा अनर्थ होता टळला.
दरम्यान यावेळी दोन ठिकाणी अज्ञाताकडून रेल्वे रुळाच्या मार्गात लोखंडी रॉड ठेवल्याने हा अपघात घडवून आणण्यासाठी केलेला प्रयत्न होता की येथे फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची मस्ती होती. याबाबत आता अधिक तपास जीआर पी चे रेल्वे पोलीस हे करीत असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
हे ही वाचा : सेंट्रल रेल्वेत तब्बल 596 जागांसाठी भरती आणि पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; ही अर्जाची डायरेक्ट Link
गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन 22 ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत पुन्हा दाखल झाली. दिवसभरात अप व डाऊन अशा चार फेऱ्या होतात. नेरळ ते माथेरानबरोबरच अमन लॉज ते माथेरान अशा शटल सेवाही चालवण्यात येतात. सध्या प्रत्येकी सहा डब्यांच्या तीन मिनी ट्रेन असून त्या डिझेल इंजिनावर धावतात.
रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता माथेरान-नेरळ अशी मिनी ट्रेन घाटातून जात असतानाच या मार्गावर रेल्वेचा एक तुकडा ठेवण्यात आला होता. हा तुकडा म्हणजे रुळांखाली वापरण्यात येणारा लोखंडी स्लीपर्स होता. हा तुकडा पाहताच मिनी ट्रेनचे लोको पायलट दिनेश आणि सहायक लोको पायलट सुधांशु यांनी प्रसंगावधान दाखवून मिनी ट्रेन थांबवली.