गडचिरोली, 01 नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या कारवाईमध्ये दोन जहाल माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दोन्ही जहाल माओवाद्यांवर 16 लाख रुपयांचे बक्षीस होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात सिकसोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. कडमेच्या जंगलात पोलिसांचे माओवाद्याविरोधी अभियान सुरू असतांना माओवाद्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार केला. प्रतिउत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन माओवाद्याचा मृत्यू झाला.
(बीड : आईच्या डोळ्यादेखत मुलाचं भयानक कृत्य, व्ह्यू पॉईंटवरून मारली खोल दरीत उडी)
या दोन्ही माओवाद्यांवर दोघांवर 16 लाखाचे बक्षीस आहे. मृतकामध्ये माओवाद्याच्या एक्शन टीमचा कमांडर जागेश सलाम आणि विभागीय समिती सदस्य दर्शन पद्दाचा समावेश आहे. घटनास्थळी एक बंदुकीसह दोन पिस्तूल वाकीटाकी जीवंत काडतुसे रोख रक्कमेसह स्फोटके सापडली आहेत.
(दिराच्या प्रेमात वेडी झाली वहिनी; क्रूरतेचा कळस गाठत पतीसोबत केलं भयानक कृत्य)
दरम्यान, मागील महिन्यात तेलंगणाच्या वारंगल येथे उपचारासाठी आलेल्या तीन माओवाद्यासह एका काँग्रेस नेत्याला पोलिसांनी अटक केली होती. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्याच्या सीमेला लागून छत्तीसगडचा भोपालपटणम तालुक्यातून उपचारासाठी माओवाद्याच्या वैद्यकीय चमुची कमांडर असलेली मदकम उनगी उर्फ कमला आणि माओवादी असम सोहेन याच्यासह मीका अनिता या तिघांसोबत घेऊन काँग्रेसचे तालुका महासचिव कोंडागोर्ला सत्यम वारंगल शहरात आले होते. तेलंगणा पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन काँग्रेस नेत्यासह तीन माओवाद्यांना अटक केली असून त्याच्याकडून पन्नास जिलेटीनच्या कांडया पन्नास डेटोनेटर 74 रोख रक्कम जप्त केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news