सातारा 07 ऑक्टोबर : सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील सातारा जिल्ह्यातील कोयनेचं जंगल हे महत्त्वाचं मानलं जातं. अनेक हिंसक प्राणी या भागात आहेत. गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान याच कोयनेच्या जंगलातील बिबट्या कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात या भागातील हेळवाक गावात घुसला. शिकारीसाठीचा हा थरार ग्रामस्थांनी डोळ्यांसमोर पाहिला. दसऱ्यालाच ट्रेनमध्ये राडा, महिलांमध्ये फ्री स्टाईल, तुंबळ हाणामारीचा Video बिबट्या शिकारीसाठी मागे धावत असल्याचं पाहून कुत्रा मात्र जीव वाचवण्याच्या प्रयत्नात एका घरात घुसला. यानंतरही बिबट्याने पाठलाग थांबवला नाही. कुत्र्याच्या शिकारीसाठी हा बिबट्याही कुत्र्यापाठोपाठ घरात घुसला. यामुळे घरमालक सुधीर कारंडे यांनी घराच्या दाराला बाहेरून लगेचच कडी लावली आणि वनविभागाला या बाबतची माहिती देण्यात आली.
सातारा: कोयनेच्या जंगलातील बिबट्या कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात हेळवाक गावातील घरात घुसला. शिकारीसाठीचा हा थरार ग्रामस्थांनी कॅमेऱ्यात कैद केला. pic.twitter.com/jhpInq1Tzz
— News18Lokmat (@News18lokmat) October 7, 2022
वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर चार तासाच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला पिंजर्यात कैद करण्यात यश आलं. ही घटना अतिशय थरारक होती आणि यावेळी संपूर्ण गावातील लोक भयभीत झाले होते. या बिबट्यावर आता प्राथमिक उपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार आहे. VIDEO - शेजारी गेलेला मुलगा घरी परतलाच नाही; बिल्डिंगच्या लिफ्टचं CCTV फुटेज पाहून सर्व हादरले हा बिबट्या घरात शिरताच सुधीर कारंडे यांनी आपल्या घराची कडी बाहेरून लावून घेतली होती. यानंतर वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याला पिंजराबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. बराच वेळ हे प्रयत्न सुरू होते. बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी याठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. अखेर या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलं.