जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दसऱ्यालाच ट्रेनमध्ये राडा, महिलांमध्ये फ्री स्टाईल, तुंबळ हाणामारीचा Video

दसऱ्यालाच ट्रेनमध्ये राडा, महिलांमध्ये फ्री स्टाईल, तुंबळ हाणामारीचा Video

दसऱ्यालाच ट्रेनमध्ये राडा, महिलांमध्ये फ्री स्टाईल, तुंबळ हाणामारीचा Video

ठाण्यावरून बसलेल्या मायलेकी आणि नात या पनवेलचे दिशेने जात होत्या.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

अमित राय, प्रतिनिधी ठाणे, 6 ऑक्टोबर : आज ठाण्यातील टिटवाळा येथे एका महिलेला मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ही घटना ताजी असतानाच ठाण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मात्र, ही घटना काल बुधवारी दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी घडली. नेमकं काय घडलं - बुधवारी संध्याकाळी पावणे आठच्या दरम्यान ठाणे ते पनवेल या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली. लोकलमधील बसण्याच्या आसनवरून तीन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ठाण्यावरून बसलेल्या मायलेकी आणि नात या पनवेलचे दिशेने जात होत्या. यावेळी कोपरखैरणे येथे महिला चढली. यानंतर तुर्भेत जागा झाली. यामुळे ती बसली असता छोट्या मुलीला बसू दिलं नाही, यावरून शाब्दिक बाचाबाची होत असताना याचं रूपांतर मारामारीत झालं. या लोकलमध्ये नेरूळ वरून महिला पोलीस कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी चढल्या असतात त्यांना देखील या मारहाणीत दुखापत झाली आहे. यासंदर्भात वाशी पोलीस ठाण्यात ठाण्यावरून चढलेल्या माय लेकीवर गुन्हा दाखल झाला आहे.

जाहिरात

हेही वाचा -  ठाण्यात महिलेसोबत भर रस्त्यावर जोरदार मारहाण, पाहा VIDEO टिटवाळ्यात महिलेलाही मारहाण - ठाण्यातील टिटवाळा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेला जोरदार मारहाण करण्यात आली आहे. तसेच मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या महिलेला मारहाण का करण्यात आली, याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. ही घटना आज सकाळी घडली.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही महिला मिळून एक महिलेला कशाप्रकारे जोरदार मारहाण करत आहेत. दरम्यान, ही धक्कादायक घटना टिटवाळा येथील गणेश मंदिर परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात