औरंगाबाद, 3 डिसेंबर : प्रत्येक शहराच्या खाद्य संस्कृतीचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण असतं. एखाद्या शहरात सुपरहिट असलेल्या पदार्थाची अन्य ठिकाणी माहितीही नसते. त्यामुळे त्याचं वेगळेपण टिकून राहतं. तो पदार्थ खाण्यासाठी शहरातील सर्व खवय्यांसह, बाहेरगावीतील मंडळी देखील तिथं आवर्जून येत असतात. औरंगाबाद शहरातही समोसा राईस हा एक खास पदार्थ मिळतो. बऱ्याच जणांना माहिती नसलेला हा पदार्थ औरंगाबादमध्ये खूपच लोकप्रिय आहे. कुठे मिळतो समोसा राईस? औरंगाबाद शहरातल्या कॅनॉट प्लेस परिसरात हा झणझणीत समोसा राईस मिळतो. 35 रुपायांमध्ये पोटभर मिळणाऱ्या या प्लेटनं औरंगाबादकरांना भुरळ पाडली आहे. हा समोसा राईस सुरू करणाऱ्या मालकाची गोष्टही तितकीच खास आहे. दिनेश झाल्टे यांनी हा पदार्थ सुरू केलाय. त्यांनी एमएससी केमिस्ट्रीपर्यंत शिक्षण घेतलंय. त्यानंतर कंपनीमध्ये पाच वर्ष नोकरीही केली. पण, नोकरीमधून मिळणाऱ्या पगारावर ते समाधानी नव्हते. दिनेश यांनी स्वतंत्र व्यवसाय करण्याचं ठरवलं. त्यातूनच त्यांनी समोसा राईसची विक्री सुरू केली.
30 वर्षांपासून कुणीच नाही जवळपास, पुणेकरांसाठी ‘हा’ समोसा आहे सर्वात खास, Video
कसा बनतो समोसा राईस? समोसा: मैदा तेल अजवन मिठ आलू अद्रक लसून, मिरची हळद जिरा, मोहरी राईस: दर्जेदार तांदूळ , जिर महूरी आद्रक, लसून पेस्ट, कांदा, तेल झणझणीत रस्सा: गरम मसाला, येसावर, खोबरं, तीळ, मीठ, मिरची पावडर, हळद दिनेश यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाला आता भरभराटी आली आहे. दिवसाला तब्बल 30 किलो तांदुळाचा राईस बनवला जातो. तर 300 पेक्षा जास्त समोस्यांची विक्री होते. झणझणीत समोसा राईसची मागणी वाढल्यामुळे सध्या असलेल्या कामगारांमध्ये त्यांना वाढ करावी लागत आहे. पूर्वी 35 हजाराचा पगार सोडून सुरू केलेल्या व्यवसायातून त्यांना आता दुपटीने म्हणजे 70 हजार रुपये महिन्याकाठी निवळ नफा त्यांना मिळतोय.
भट्टी वडापावची चव सर्वांपेक्षा वेगळी, एकदा खाल्ला तर… Video
नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा धाडस केलं. सध्या या व्यवसायातून मिळत असलेले उत्पन्न समाधान देत आहे भविष्यात व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दिनेश यांनी सांगितलं. तर येथे नियमित येणारे विद्यार्थी देखील कमी पैशांमध्ये टेस्टी आणि पोटभर खायला मिळत असल्यानं चांगलेच खूश आहेत. 35 रुपयांमध्ये मिळणाऱ्या या समोसा राईसमध्ये कांदा, रस्सा, मिरची, लिंबू, आणि काकडी देखील मिळते. समोसा राईसच्या होम डिलिव्हरीची सोय देखील उपलब्ध आहे.
गुगल मॅपवरून साभार