सातारा, 15 ऑक्टोबर : मुंबई जवळील ठाण्यामध्ये रिक्षाचालकाने एका विद्यार्थ्यांनीला फरफटत नेण्याची घटना ताजी असताना साताऱ्यातून विचित्र अपघाताची घटना घडली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीस्वाराने तरुणाला धडक दिली आणि फरफटत नेलं. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सातारा शहरातील कराड विद्यानगर रस्त्यावर ही घटना घडली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका दुचाकी स्वाराने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या तरुणाला धडक दिली. दुचाकी स्वाराने या युवकाला धडक देत फरफटत घेऊन गेल्याने एक युवक गंभीर जखमी झाला आहे. भरधाव दुचाकीने धडक दिल्यानंतर हा तरुण रस्त्यावरच जोरात आदळला. हा संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
#सातारा : भरधाव दुचाकीस्वाराने तरुणाला धडक घेऊन नेलं फरफटत, साताऱ्यातील घटना pic.twitter.com/2yThBnjOJB
— News18Lokmat (@News18lokmat) October 15, 2022
अपघात जखमी झालेल्या युवकाचे नाव समाधान खरात आहे. आता या युवकावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विद्यानगर परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला फुटपाथ वर अतिक्रमण झाल्याने या परिसरातील लोकांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे. त्यामुळे असे अपघात होत असल्याचे मत येथील नागरिक व्यक्त करत आहेत. (( तरूणांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारं सेक्स्टॉर्शन असतं काय? पुण्यात घडले हजारो प्रकार )) त्यामुळे या परिसरात असलेले अतिक्रमण लवकरात लवकर काढण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत. ठाण्यात रिक्षाचालकाचं संतापजनक कृत्य
ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर परीसरातील धक्कादायक प्रकार, रिक्षावाल्याने केला तरुणीचा विनयभंग, रिक्षावाल्याला जाब विचारायला गेलेल्या तरुणीला रिक्षावाल्याने फरफटत नेले, घटना सिसिटिव्हित कैद #Thane #cctv #molestation #CrimeNews pic.twitter.com/mqfoOr22Sc
— News18Lokmat (@News18lokmat) October 14, 2022
ठाणे रेल्वे स्टेशनबाहेरच्या परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षाचालकाने एका तरुणीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने संतापजनक कृत्य केल्यानंतर तिला जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीला रिक्षाचालकाने फरफटत नेलं. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. विशेष रेल्वे स्टेशन परिसरात याआधीदेखील अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आरोपींना पोलिसांता धाक राहिलेला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय. नेमकं काय घडलं? तरुणाने अश्लिल शेरेबाजी केली. त्याचा जाब विचारायला मुलगी गेली असता त्याने आणखी अश्लिल वर्तन केले. यामुळे तरुणीने त्याची कॅालर पकडली. तोच रिक्षावाल्याने रिक्षा पळवली आणि मुलीला फरपटत नेले. मुलगी रस्तावर पडली आणि तिला दुखापत झाली. संबंधित प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. (भिवंडीत मोठी दुर्घटना, चार जणांवर वीज कोसळली, दोघांचा मृत्यू) विकृत तरुणाने तरुणीला फरफटत नेल्याने ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपी तरुण हा पळून गेला. त्यानंतर रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी तरुणीला रस्त्यावरुन उठवलं आणि तिची विचारपूस केली. त्यानंतर तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काही नागरिकांना आरोपी रिक्षाचालकाला देखील पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही. पोलीस याप्रकरणी आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.