मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी पूरग्रस्तांसोबत केलं जेवण, VIDEO

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी पूरग्रस्तांसोबत केलं जेवण, VIDEO

 देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) आणि प्रवीण दरेकर (praveen darekar) हे सातारा (satara flood) जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहे.

सातारा, 28 जुलै : भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) आणि प्रवीण दरेकर (praveen darekar) हे सातारा (satara flood)जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहे. पूरग्रस्तांची पाहणी करत असताना लोकांनी जेवणाचा आग्रह केला असता फडणवीस यांचा साधेपणा पाहण्यास मिळाला. पूरग्रस्तांसोबत फडणवीस यांनी जमिनीवर बसून जेवण घेतलं. (Devendra Fadnavis and Praveen Darekar had a lunch with the flood victims)

साताऱ्यातील पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे लोकांचं अतोनात नुकसान झालं. घरच्या घर दरडीच्या ढिगाराखाली गाडली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी एका शाळेत आसरा घेतला आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी शाळेत जाऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी गावकऱ्यांनी फडणवीस आणि दरेकर यांना जेवणाचा आग्रह केला. त्यावेळी फडणवीस आणि दरेकर यांनी पूरग्रस्तांसोबत जमिनीवर जेवण केलं. भाजपचे मोठे नेते आणि माजी मुख्यमंत्री आपल्यासोबत जेवणाला बसलेले पाहून उपस्थितींनी कौतुक केलं.

7 महिन्यांनी शाळा सुरू होताच माकडांनी घेतला ताबा; पटकावली प्राचार्यांची खुर्ची

दरम्यान,  पूरग्रस्त भागातील नागरिकांचं लवकरात लवकर पुनर्वसन करावं. आजूबाजूच्या घरांसह एकत्रित पुनर्वसन करावं लागेल. ग्रामस्थांच्या पसंतीने पुनर्वसन करावं आणि अनाथ झालेल्या मुलांबाबत वेगळा विचार करावा, असं यावेळी फडणवीस म्हणाले.

तसंच, शासन पातळीवर व्यवस्था झाली आहे पण हे फार काळ चालणार नाही. नेहमी येणाऱ्या या संकटाचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी पुनर्वसन करावं लागेल.  कोण, कुठे कमी पडले हे विवेचन करणार नाही, टीका करायची नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांनी जावं असं शरद पवार म्हणाले, प्रशासनावर ताण पडतो हे योग्य आहे, असंही फडणवीस म्हणाले.

First published:

Tags: Devendra Fadnavis