मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Satara Accident : टेम्पोचा टायर निघाला अन् थेट विद्यार्थ्याच्या अंगावर आला पुढे जे घडलं ते भयानक

Satara Accident : टेम्पोचा टायर निघाला अन् थेट विद्यार्थ्याच्या अंगावर आला पुढे जे घडलं ते भयानक

सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे महामार्गावर भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. पुण्याला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्याला चालू टेम्पोचा टायर निघून धडक बसल्याने मृत्यू झाला.

सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे महामार्गावर भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. पुण्याला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्याला चालू टेम्पोचा टायर निघून धडक बसल्याने मृत्यू झाला.

सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे महामार्गावर भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. पुण्याला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्याला चालू टेम्पोचा टायर निघून धडक बसल्याने मृत्यू झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 13 सप्टेंबर : सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे महामार्गावर भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. पुण्याला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्याला चालू टेम्पोचा टायर निघून धडक बसल्याने मृत्यू झाला. काल (दि.12) महामार्ग स्टॉपवर ही घटना घडली. प्रेम महेंद्र ढमाळ (वय 21 रा. असवली, ता. खंडाळा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान या युवकाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक झालेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

या अपघाताला टेम्पो चालक मधुकर जाधव (रा. भक्तवडी, ता. कोरेगाव) हा जबाबदार असल्याने त्याच्यावर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रथमेश आबा काळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मधुकर जाधव याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील स्टॉप हे जीवघेणे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून पोलिस आणि महामार्ग प्राधिकरणाने वेळीच लक्ष घालावे.

हे ही वाचा : धक्कादायक! इलेक्ट्रिक बाइक चार्ज करताना शोरूमला आग, 6 जणांचा मृत्यू

पुणे येथे शिक्षणासाठी निघालेला प्रेम हा मित्रासोबत महामार्ग स्टॉप येथे थांबला होता. याचवेळी पुण्याकडे भरधाव वेगात आयशर टेम्पो (क्रमांक एम. एच. 11 ए. एल 1701) निघाला होता. स्टॉपवर टेम्पो आला असता वेगामध्येच टेम्पोची दोन्ही चाके निघून प्रेम ढमाळ याच्या अंगावर आली. यामध्ये धडकेत तो रक्तबंबाळ झाला. गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

साताऱ्यात 24 तासांत दोन अपघात

वाई-जांभळी रस्त्यावर धोम गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होवून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना सोमवारी दुपारी घडली. तानाजी नवलू शेलार (वय 32, रा. खावली, ता. वाई) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

वाईच्या पश्चिम भागातील रेणावळे या गावी ज्ञानदेव चंद्रकांत सणस (वय 24) हे आपल्या दुचाकीवरुन आजी आजोबांना भेटण्यासाठी गेले होते. तेथून ते परतत असताना दुपारी त्यांची दुचाकी साडेचारच्या सुमारास धोम गावच्या हद्दीत आली. त्यावेळी समोरुन भरघाव वेगाने येणार्‍या दुचाकीने सणस यांच्या दुचाकीला धडक दिली.

हे ही वाचा : महामार्ग टोलमुक्त होणार! सरकार आणणार नवी सिस्टीम, पण, स्थानिकांना बसणार फटका

दोन्हीही दुचाकीस्वार गंभीर जखमी होवून बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडले. स्थानिकांनी जखमींना तातडीने वाईच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तानाजी शेलार यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक एस डी वाळुंज करीत आहेत.

First published:

Tags: Major accident, Road accident, Satara, Satara (City/Town/Village), Satara news, Student