सिकंदराबाद, 13 सप्टेंबर : तेलंगणाची राजधानी हैदराबादला लागून असलेल्या सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला आग लागली आहे. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दरम्यान अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. परंतु रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर अन्य काही लोक यामध्ये अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. (Electric bike showroom fire)
अतिरिक्त डीसीपी, उत्तर विभाग, हैदराबाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे सिकंदराबादमधील पासपोर्ट कार्यालयाजवळील इलेक्ट्रिक बाइक शोरूममध्ये आग लागली. शोरूमच्यावर लॉज आहेत, ज्यामध्ये अनेक लोक अडकले होते. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान अद्यापही घटनास्थळी बचावकार्य असल्याचेही ते म्हणाले.
हे ही वाचा : महामार्गावर तरुणाच्या दुचाकीने घेतला पेट; दृश्य पाहून मुख्यमंत्री भरपावसात गाडीतून उतरले अन्..., VIDEO
Very unfortunate incident. Fire brigade teams tried their best to rescue people from the lodge but due to heavy smoke, some people died. Some people were rescued from the lodge. We are probing how the incident happened: Telangana Home Minister Mohd Mahmood Ali https://t.co/6MwdNqzFKh pic.twitter.com/tMd1IW0yYH
— ANI (@ANI) September 13, 2022
याबाबत तेलंगणाचे गृहमंत्री यांनी या घटनेचा आढावा घेतला यावर ते म्हणाले कि, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अग्निशमन दलाच्या पथकांनी लॉजमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण धुरामुळे काही लोकांचा मृत्यू झाला. लॉजमधून काही जणांची सुटका करण्यात आली. ही घटना कशी घडली याचा आम्ही तपास करत आहोत. नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे असे मोहम्मद अली म्हणाले.
तामिळनाडूमध्येही असाच प्रकार घडला होता.
तमिळनाडूमध्ये एप्रिल महिन्यात अशीच एक घटना घडली होती. तामिळनाडूतील पोरूर-कुंदरातूर शोरूममध्ये एका ग्राहकाने आपल्या ई-बाईकची बॅटरी चार्ज करण्यासाठी लावली होती. काही वेळातच आग लागली. हळूहळू संपूर्ण शोरूम आगीत जळून खाक झाले. या घटनेत 5 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणि सर्व्हिसिंगसाठी आलेल्या 12 जुन्या इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक झाल्या होत्या.
हे ही वाचा : महामार्ग टोलमुक्त होणार! सरकार आणणार नवी सिस्टीम, पण, स्थानिकांना बसणार फटका
आग लागल्यानंतर शोरूममधून धुराचे लोट उठू लागल्याचे पाहून लोक घाबरले. या घटनेनंतर परिसरातील नागरिक रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने जमाव हटवण्यात आला होता. मात्र, आगीच्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. स्थानिक लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र त्यापूर्वीच संपूर्ण शोरूम जळून खाक झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Electric vehicles, Electricity, Fire, Hyderabad, Telangana