जाहिरात
मराठी बातम्या / देश / लखनऊनंतर दिल्लीतही कॅबचालकाला मारहाण; महिलेनं भररस्त्यात लगावल्या कानशिलात, VIDEO VIRAL

लखनऊनंतर दिल्लीतही कॅबचालकाला मारहाण; महिलेनं भररस्त्यात लगावल्या कानशिलात, VIDEO VIRAL

लखनऊनंतर दिल्लीतही कॅबचालकाला मारहाण; महिलेनं भररस्त्यात लगावल्या कानशिलात, VIDEO VIRAL

Crime in Delhi: लखनऊनंतर राजधानी दिल्लीत (Delhi) देखील महिलेनं कॅब चालकाला मारहाण (Woman beat cab driver) केल्याची घटना समोर आली आहे. मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: काही दिवसांपूर्वी लखनऊ (Lucknow) याठिकाणी एका महिलेनं कॅब चालकाला भररस्त्यात बेदम मारहाण (Woman beat cab driver) केली होती. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) झाल्यानंतर, देशभरातून अनेकांनी संताप व्यक्त केला होता. तसेच संबंधित महिलेविरोधात पोलीसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आता राजधानी दिल्लीत (Delhi) देखील कॅब चालकाला महिलेनं मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिला भरस्त्यावर एका गरीब कॅब चालकाला मारहाण करत आहे. मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होतं आहे. संबंधित घटना दिल्लीच्या वेस्ट पटेल नगरच्या कस्तुरी लाल आनंद मार्गावरील ब्लॉक  22 मधील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला अन्य तरुणीसोबत दुचाकीवरून जात होती. रस्त्यावर ट्रॅफिक असल्याने ती महिला एका कॅबच्या पाठीमागे अडकली होती. कॅबचालकाने दुचाकीला वाट न दिल्याने रागाच्या भरात महिलेनं दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून कॅबचालकाला शिवीगाळ केली आहे. हेही वाचा- कॅब चालकाला मारहाण करणं ‘त्या’ महिलेला भोवलं; VIDEO समोर येताच पोलिसांची कारवाई आरोपी महिला एवढ्यावरच थांबली नाही. तर तिने कॅब चालकाला कारमधून खेचून बाहेर काढत त्याला भररस्त्यात मारहाण केली आहे. महिलेनं एकापाठोपाठ एक कॅबचालकाच्या कानशिलात लगावल्या आहेत. काही लोकांनी संबंधित महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तिने त्यांनाही अपशब्द वापरले आहेत. मारहाण होत असताना कॅब चालक शांतपणे उभा होता. त्यानं महिलेला कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

जाहिरात

या प्रकरणी कॅब चालकाने तक्रार दाखल केल्यास गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हा व्हिडीओ एक आठवड्यापूर्वीचा असून संबंधित कॅब चालक फरीदाबाद येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मारहाण करणाऱ्या महिलेच्या दुचाकी क्रमांकाच्या आधारे तिचा पत्ता शोधण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात