जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Santosh Bangar : VIDEO : विज तोडाल तर रट्टे घालीन, संतोष बांगरांकडून पुन्हा शासकीय कर्मचाऱ्याला धमकी

Santosh Bangar : VIDEO : विज तोडाल तर रट्टे घालीन, संतोष बांगरांकडून पुन्हा शासकीय कर्मचाऱ्याला धमकी

Santosh Bangar : VIDEO : विज तोडाल तर रट्टे घालीन, संतोष बांगरांकडून पुन्हा शासकीय कर्मचाऱ्याला धमकी

हिंगोली, कळमनुरी विधानसभेचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त कारणाने चर्चेत असतात.

  • -MIN READ Hingoli,Maharashtra
  • Last Updated :

मनीष खरात (हिंगोली), 25 नोव्हेंबर : हिंगोली, कळमनुरी विधानसभेचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त कारणाने चर्चेत असतात. मागच्या महिन्यात आमदार बांगर अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्याने जोरदार चर्चेत आले होते. यानंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. यापूर्वी त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाणीची धमकी, शिवीगाळ असे प्रकार केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी महावितरणच्या एका कर्मचाऱ्याला फोन करून मारहाणीची धमकी दिली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

जाहिरात

महावितरणचे कर्मचारी थकीत बिलामुळे लाईन तोडण्यासाठी तगादा लावत असल्याचे प्रकरण आमदार संतोष बांगर यांच्याकडे गेले होते. यावर आमदार बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आहे. इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन, असा इशारा बांगर यांनी दिला.

हे ही वाचा :  ‘राज्यपाल मनापासून मराठी व्यक्तीवर प्रेम करणारे, पण…’; अमृता फडणवीसांकडून कोश्यारींची पाठराखण

त्यांनी कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कृषी पंपांच्या थकीत बिलांमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे संतोष बांगर संतापले आणि त्यांनी दमदाटी केली.

जाहिरात

मतदार संघातील प्रश्नावर संतोष बांगर नेहमी आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख झाली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाच्या कानाखाली लावल्याने यावर जोरदार राजकीय चर्चा रंगल्या होत्या.

कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या एका हॉटेलची पाहणी करत असताना अन्नाचा निकृष्ट दर्जा पाहून बांगर चांगलेच संतापले आणि त्यांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लावली होती.

जाहिरात

हे ही वाचा :  कोश्यारींसह फडणवीस निघाले दिल्लीला, राज्यपाल बदलीबाबत केंद्रीय स्तरावर चर्चेची शक्यता

संतोष बांगर यांनी या उपहारगृहाच्या किचनची पाहणी केली असता बराच भाजीपाला हा सडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचपासून पुढे अन्न तयार करून ते लोकांना पोहचवले जात होते. तसेच शासनाने सांगितलेल्या पदार्थांपैकी कोणताच पदार्थ दिला जात नव्हते. रोज एकसारखेच अन्न दिले जात आहे. त्यामुळेच संबंधित कंत्राटदाराची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी बांगर यांनी जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाकडे केली होती.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात