जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदे गटातील 'संजय' आमच्या संपर्कात, सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा

शिंदे गटातील 'संजय' आमच्या संपर्कात, सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा

'5 मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे. जर तुम्ही प्रकल्प गुजरातला देत असाल तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवावे'

'5 मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे. जर तुम्ही प्रकल्प गुजरातला देत असाल तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवावे'

‘कधी कधी माणसं बेईमान होतात, मात्र परतीचे दोर आमच्याकडून कापले गेलेले नाहीत.’

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 नोव्हेंबर : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. कधी कधी माणसं बेईमान होतात, मात्र परतीचे दोर आमच्याकडून कापले गेलेले नाहीत, असंही त्या यावेळी म्हणाल्या. सद्यस्थितीत सर्वात प्रथम शिंदे गटातून संजय शिरसाट परत येणारे आमदार असल्याचाही धक्कादायक दावा अंधारेंनी केला आहे. संजय शिरसाठ यांची ना मंत्रिपदात ना कार्यकारणीत वर्णिली लागली आहे. संभाजीनगरमध्ये अतुल सावे, अब्दुल सत्तार व संदिपान भुमरे यांना मंत्रिपद देऊन संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदाची आशा मावळली आहे. शिंदे गटात जाऊन सर्वात जास्त पश्चाताप संजय शिरसाटांना होत असल्यानं ते लवकरच ठाकरे गटात येणार असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे आमच्या संपर्कात असल्याचा खळबळ जनक दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला असून संभाजीनगरमध्ये अतुल सावे अब्दुल सत्तार व संदिपान भुमरे यांना मंत्रिपद देवून संजय शिरसाठ यांची मंत्री पदाची आशा मावळली असून शिंदे गटात जाऊन सर्वात जास्त पश्चाताप हा संजय शिरसाट यांना झाल्याचे वक्तव्य ही सुषमा अंधारे यांनी केले आहे. आता शिंदे गटातून कोणी येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. “लाव ते रे तो व्हिडिओ” म्हणत सुषमा अंधारेंनी घेतला विरोधकांचा समाचार दुसरीकडे, रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पण त्यांच्यात शाब्दिक चकमक अजूनही सुरूच आहे. या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या लेखी हा वाद संपलेला आहे, दोघांनाही विनंती आहे की राज्याच्या हितासाठी वाद संपवून पुढे गेलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोक्यांचे आरोप केले. या आरोपानंतर वादाला सुरूवात झाली, अखेर शिंदे आणि फडणवीस यांनी दोन्ही नेत्यांना बोलवून घेतलं, यानंतर वाद संपेल असं वाटत होतं, पण बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळाव्यात राणांना पुन्हा डिवचलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात