जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा; नेमकी चूक कुठे झाली? राऊतांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा; नेमकी चूक कुठे झाली? राऊतांनी स्पष्टच सांगितलं

संजय राऊत

संजय राऊत

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मात्र या पुरस्कार सोहळ्यात उष्मघातामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 एप्रिल : अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला, यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. नवी मुंबईच्या मैदानामध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं.  या कार्यक्रमात आलेल्या  11 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे, तर काही जणांवर उपचार सुरू आहेत. संजय राऊत यांची प्रतिक्रिया यावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या कार्यक्रमावरून त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. या कार्यक्रमात आलेल्या लोकांसाठी पुरेशी सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही. कार्यक्रम भर दुपारी आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम संध्याकाळी आयोजित करता आला असता. मात्र या कार्यक्रमात श्री सदस्यांची नाही तर व्हिआपींची सोय पाहिली गेली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अजित पवारांनी घेतली रुग्णांची भेट दरम्यान या घटनेनंतर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची  राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची वेळ योग्य ती ठरवायला हवी होती. भर दुपारी कार्यक्रम घेणं चुकीचं होतं. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केल्यानंतरही असं घडायला नको होतं अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवार यांनी दिली. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना  प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात