जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ? 'ते' प्रकरण राज्यसभा हक्कभंग समितीकडे

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ? 'ते' प्रकरण राज्यसभा हक्कभंग समितीकडे

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ?

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 मे : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ असं म्हटल्यामुळे राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यसभा सभापतींकडे पाठविले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर 16 आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय विधानसभाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकरात लवकर घ्यावा यासाठी ठाकरे कटाचे खासदार संजय राऊत आग्रही मागणी करत आहेस. तसेच अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप करून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केला आहे. संजय राऊत यांचं प्रकरण आता राज्यसभेत शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रकरण राज्यसभा हक्कभंग समितीकडे पाठवण्यात आले. राज्यसभा सभापती जगदीश धनकर यांनी हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग प्रकरण राज्यसभा सभापतींकडे पाठविले होते. विधान मंडळाला चोर मंडळ म्हटल्याने संजय राऊत यांच्या हक्कभंग आणला होता. काय आहे प्रकरण? संजय राऊत यांनी विधिमंडळाबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यासाठी भाजप आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय विधानसभा हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली होती. राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव अर्थसंकल्पीय अधिवेनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मांडण्यात आला. त्यानंतर तो पुढील कारवाईसाठी असलेल्या राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पाठवण्यात आला होता. वाचा - प्रकाश आंबेडकर लोकसभा लढवणार? ठाकरे बालेकिल्ला सोडायला तयार! शिरसाट यांचे आरोप काय? विधानसभा अध्यक्ष हे विधिमंडळाच्या कार्यप्रमाणालीत कोणत्याही पक्षाचे नेतृत्व करत नाहीत. ते सर्वच पक्षांचे विधिमंडळातील पीठासन अधिकारी असतात. त्यामुळे त्यांच्यावर खोटो, बेफाम आरोप करून जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याबरोबरच विधिमंडळाचे पावित्र्य धोक्यात आणण्याचे काम संजय राऊत करत आहेत. त्यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांवर केले जाणारे आरोप हे त्यांना धमकावण्यासाठी केले दात आहेत. अध्यक्षपादीच मानहानी करत आहेत. राऊत यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न होत असून तो हक्कभंग या प्रकारात मोडत असल्याची आमची धारणा आहे, असं पत्र संजय शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात