तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल, राज ठाकरे यांच्या मनसेचा MIM ला इशारा

तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल, राज ठाकरे यांच्या मनसेचा MIM ला इशारा

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एमआयएमला थेट इशारा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एमआयएमला थेट इशारा दिला आहे. 'वाचाळवीरांना 'आम्ही' इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल,' असं ट्वीट मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे.

"आता आपल्याला एकत्र आलं पाहिजे. एकत्रितपणे लढलं पाहिजे. स्वातंत्र्य तर मिळायलाच हवं. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या. 15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना," असं चिधावणीखोर वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं. वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर मनसेनंही तितकच चिथावणीखोर प्रत्युत्तर दिलं आहे. 'आम्ही...' 'तुम्ही...' असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण.... 'आम्ही' इतके, 'तुम्ही' तितके... अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना 'आम्ही' इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल, असं ट्वीट मनसेनं केलं आहे.

'15 कोटी आहोत पण 100 कोटींवर भारी आहोत'

'इट का जवाब पत्थर से' हे आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या, अशी चिथावणीखोर भाषा वापरत MIM चे नेते वारिस पठाण यांनी वादग्रस्त भाषण केलं. दोन समाजात तेढ निर्माण करू शकतील अशी धक्कादायक विधान पठाण यांच्या भाषणात केली.

कर्नाटकातल्या गुलबर्गा इथे वारिस पठाण यांनी जाहीर भाषणात अशी वादग्रस्त विधानं केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM)चे नेते वारिस पठाण माजी आमदार आहेत. मुंबईतल्या भायखळा मतदारसंघातून ते गेल्या विधानसभेत निवडून आले होते. CAA च्या विरोधातल्या मोर्चांचा संदर्भ देत ते या भाषणात म्हणाले, "ते म्हणतात आम्ही मुद्दाम स्त्रियांना पुढे केलं. पण विचार करा अजून फक्त आमच्या सिंहिणी पुढे आल्यात तर यांचा घाम निघालाय. आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो तर काय होईल!", अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्ष धमकी दिली.

समोर उपस्थित समुदायाला उद्देशून ते म्हणाले,"आता आपल्याला एकत्र आलं पाहिजे. एकत्रितपणे लढलं पाहिजे. स्वातंत्र्य तर मिळायलाच हवं. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या. 15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना!"

First published: February 20, 2020, 5:45 PM IST

ताज्या बातम्या