''बाळासाहेब हाच महाराष्ट्राचा आत्मा, बाळासाहेब आजही अमर आहेत'': संजय राऊत
''बाळासाहेब हाच महाराष्ट्राचा आत्मा, बाळासाहेब आजही अमर आहेत'': संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. बाळासाहेब ठाकरे हाच महाराष्ट्राचा आत्मा असल्याचं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
मुंबई, 23 जानेवारी: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची (Balasaheb Thackeray Birth Anniversary)आज 96 वी जयंती आहे. या निमित्तानं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. बाळासाहेब ठाकरे हाच महाराष्ट्राचा आत्मा असल्याचं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
अखंड महाराष्ट्र स्वाभिमानी, शक्तीमान, अस्मिता हे बाळासाहेबांचं योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे हाच महाराष्ट्राचा आत्मा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राबाहेर आम्ही अभिमानांनी सांगतो की आम्ही मराठी आहोत याचा आत्मविश्वास बाळासाहेबांनी दिला, असंही संजय राऊत यांनी म्हणाले.
''आज आम्हाला बाळासाहेब भेटल्यासारखं वाटेल, आमचा भाऊ आम्हाला भेटणार''
देशात सांगतो, आम्ही हिंदू आहेत. हिंदुत्वाची अस्मिता देखील बाळासाहेबांनी दिली. तसंच बाळासाहेबांनी जगाला देशाची हिंदू राष्ट्र म्हणून ओळख करुन दिल्याचंही वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरे आजही अमर आहेत, ते आमच्यासोबत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
''शिवसेनेच्या राजकारणाची पुढची भूमिका मांडतील''
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. राज्याचे प्रमुख म्हणून जनतेशी संवाद साधतील. त्यात शिवसेनेच्या राजकारणाची पुढची दिशा देखील देतील आणि भूमिका मांडतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
Budget 2022: निर्मला सीतारामन यांच्या या उपाययोजना सामान्यांना देणार मोठा दिलासा
मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम असून विरोधकांना त्यांच्या तब्येतीची अधिक चिंता वाटते. त्याविषयी ते नेहमी बोलत असतात, विरोधी नेत्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीची लक्षणं आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
संजय राऊत यांची रोखठोक भूमिका
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातील आपल्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. आज बाळासाहेब असते तर महाराष्ट्रातील भाजपच्या बेताल माकडचेष्टा पाहून बाळासाहेबांनी कोणत्या मार्मिक टिपण्या केल्या असत्या? त्यांच्या मनात व्यंगचित्रांच्या कोणत्या रेषा उमटल्या असत्या? असं म्हणत संजय राऊत यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत
बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ते 96 वर्षांचे असते. योद्ध्याचे वय मोजायचे नसते. मृत्यूनंतरही तो जिवंतच असतो व लढण्याची प्रेरणा देत असतो. बाळासाहेब ठाकरे हे त्या अर्थाने कधीच म्हातारे झाले नाहीत. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांचे वाढदिवस जोरात साजरे झाले, पण वय मोजलेले त्यांना आवडत नसे. बाळासाहेब म्हणजे राजकारणातला एक मनोवेधक विषय ठरला. त्यांचे आयुष्य म्हणजे कृतींनी गजबजलेले मनोहारी नाट्यच होते. त्या नाट्यास बहुरंगी छटा होत्या.
महाराष्ट्रात आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. या स्थितीत बाळासाहेब ठाकरे ‘मातोश्री’वर असते तर त्यांची काय भूमिका असती, असा मिश्कील प्रश्न अनेकांना पडल्याशिवाय राहात नाही. विशेषतः महाराष्ट्रातील भाजपच्या बेताल माकडचेष्टा पाहून बाळासाहेबांनी कोणत्या मार्मिक टिपण्या केल्या असत्या? त्यांच्या मनात व्यंगचित्रांच्या कोणत्या रेषा उमटल्या असत्या?.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.