तळागाळातल्या लोकांना त्यांनी महापौर, मंत्रिपद अशा अनेक संधी दिल्या. पैसे घेऊन तिकीट देता असे आरोप कधीच झाले नाहीत, असंही किशोरी पेडणेकर यांनी यावेळी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी साधणार ऑनलाईन संवाद शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज शिवसैनिकांसोबत संवाद (Uddhav Thackeray will interact with Shivsainik) साधणार आहेत. आज ऑनलाईन माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. आज 23 जानेवारी म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसैनिकांना काय आदेश देणार? येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका लक्षात घेता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना काय आदेश देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता शिवसैनिकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील.महापौर किशोरी पेडणेकर शिवाजी पार्क येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचल्या pic.twitter.com/eiKbwkLZk0
— News18Lokmat (@News18lokmat) January 23, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bal Thackeray (Politician), Kishori pedanekar, Shivsena, Uddhav Thackeray (Politician)