मुंबई, 29 जून : सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला बहुमत चाचणी घ्यायला सांगितल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री अत्यंत gracefully पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही, असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले. जनमानस देखील जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ .तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना, धगधगत ठेऊ! असं संजय राऊत म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री अत्यंत gracefully
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2022
पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे.
लाठ्या खाऊ .तुरुंगात जाऊ.
पण बाळासाहेबांची शिवसेना
धगधगत ठेऊ! pic.twitter.com/smK6e3GKHa
खरंतर 2019 साली शरद पवार आणि संजय राऊत यांच्या प्रयत्नानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडी सरकार आलं, पण एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांच्यावरच टीका केली. काय म्हणाले उद्धव ठाकरे? “गुळाच्या ढेपेला मुंगळा चिपकून बसतो, तसा मी चिपकून बसणारा नाही. मी गेल्या बुधवारीच वर्षा निवासस्थान सोडून माझ्या मातोश्री निवासस्थानी आलो. मी आज आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा देखील त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिला. ठिक आहे, मी घाबरणारा नाही. पण कारण नसताना उद्या जे काही बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल त्या पापाचे धनी जे कुणी असतील त्यांना होऊद्या. मी होणार नाही. म्हणून मी शिवसैनिकांना सांगतोय, उद्या अजिबात मध्ये येऊ नका. जे काही व्हायचंय ते होऊद्या. त्यांचा गुलाल त्यांना उधळू द्या”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज राजीनामा दिल्यानंतर केलं. “शिवसेनेला सत्तेतून खाली खेचलंत. शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन उतरवलं, त्यांचे पेढे त्यांना खाऊ द्या आणि ज्यांना वाटायचेत त्यांना वाटू द्या”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.