जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...म्हणून भाजप, शिंदे गटाला पाठिंबा, संजय पवार यांचा मोठा गौप्यस्फोट; खडसेंवरही साधला निशाणा

...म्हणून भाजप, शिंदे गटाला पाठिंबा, संजय पवार यांचा मोठा गौप्यस्फोट; खडसेंवरही साधला निशाणा

...म्हणून भाजप, शिंदे गटाला पाठिंबा, संजय पवार यांचा मोठा गौप्यस्फोट; खडसेंवरही साधला निशाणा

राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी एकनाथ खडसे यांना साथ न देता दूध संघाच्या निवडणुकीत गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे. यावरून आता आरोप, प्रत्यारोप सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे.

  • -MIN READ Jalgaon,Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

जळगाव, 29 नोव्हेंबर : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत पॅनल उभा केल्यानं सर्वपक्षीय पॅनलच्या अशा मावळल्या आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी विरूद्ध भाजप, शिंदे गट असा थेट सामना रंगणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे,  शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे मंत्री गिरीश महाज यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र असे असतानाही राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी एकनाथ खडसे यांना साथ न देता या निवडणुकीत  गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे. यावरून आता आरोप, प्रत्यारोप सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. संजय पवार यांचा खोचक टोला   यावरू एकनाथ खडसे यांनी संजय पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीचे दार बंद झाल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय पवार यांनी जोरदार टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंसाठी जेव्हा भाजपने दरवाजे बंद केले तेव्हा त्यांच्यासाठी आम्हीच राष्ट्रवादीचे दरवाजे उघडले. त्यामुळे माझे राष्ट्रवादीचे दरवाजे कोण बंद करणार? असा खोचक टोला संजय पावर यांनी लगावला आहे. हेही वाचा :   उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कृष्णा हेगडे शिंदे गटात, लगेच मोठी जबाबदारीही दिली खडसेंना विरोध  एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी  प्रवेशाला काही जणांकडून विरोध होता. तरीही राष्ट्रवादीत आल्यानंतर लगेच खडसेंना विधान परिषदेची जागा दिली.  दूध संघाच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसे यांच्याकडून काही गंभीर अटी शर्ती घालण्यात आल्या होत्या. मात्र या अटी मला मान्य नव्हत्या. याबाबत आपण अजित पवार यांच्याशी बोलणार असल्याचं देखील संजय पवार यांनी म्हटलं आहे. हेही वाचा :  आमचे वैचारिक मतभेद पण…; संजय राऊतांच्या समन्सवर केसरकर स्पष्टच बोलले दूध संघाच्या निवडणुकीत चूरस   दरम्यान यावेळी दूध संघाच्या निवडणुकीत चूरस पहायला मिळण्याची शक्यात आहे. महाविकास आघाडीने आपलं पॅनल निवडणुकीत उभं केल्यानं आता महाविकास आघाडी विरूद्ध भाजप, शिंदे गट असा थेट सामना रंगणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात