दरवर्षीप्रमाणे यंदाही सिव्हिल लाइन्स स्थित हिस्लॉप कॉलेजमध्ये वार्षिक पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
हिस्लॉप कॉलेजच्या वनस्पतिशास्त्र विभागातर्फे आयोजित 19 वे पुष्प प्रदर्शन शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सकाळी 8.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल.
कॅम्पसमध्येच उगविण्यात आलेल्या 60 विविध प्रकारच्या शेवंतीची फुले हे यंदाचे विशेष आकर्षण आहे. यानिमित्ताने एकाच जागी शेवंतीचे तब्बल साठ प्रकार अनुभवता येतील.