जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Weather Update Today : राज्यात कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा, इथं चेक करा तुमच्या शहरातील तापमान

Weather Update Today : राज्यात कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा, इथं चेक करा तुमच्या शहरातील तापमान

Weather Update Today : राज्यात कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा, इथं चेक करा तुमच्या शहरातील तापमान

थंडीचा जोर वाढण्यासाठी महाराष्ट्रातील बहुतेक भागाला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. तुमच्या शहरातील हवामान किती होतं हे ‘इथं’ पाहा

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 डिसेंबर : थंडीचा जोर वाढण्यासाठी महाराष्ट्रातील बहुतेक भागाला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील अनेक भागात तापमानात वाढ झाली आहे. हे वातावरण आणखी काही दिवस तसेच राहिल असा अंदाज ‘स्कायमीटरनं’ व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्र पुणे शहरात  सोमवारी दिवसभरात कमाल तापमान 32 अंश राहील, तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. गुरूवारी पुण्यात 14.2 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. कोल्हापूरमध्ये सोमवारी दिवसभरात कमाल तापमान 32 अंश तर किमान 16 अंश असेल. सांगलीमध्ये कमाल  32 तर किमान 19 अंश सेल्सियस तापमानाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. तर सोलापूरमध्ये कमाल  31 तर किमान तापमान 16 अंश सेल्सियस असेल असा अंदाज आहे.

जाहिरात

उत्तर आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये कमाल तापमान अद्यापही 30 पेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे. सोमवारी दिवसभरात कमाल तापमान 31 तर किमान 16 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तर, अहमदनगरमध्ये कमाल तापमान 33 अंश तर किमान 18 अंश सेल्सियस असेल, असा अंदाज आहे. मराठवाडा मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 12.6 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद  झाली आहे. तर बीड शहरात कमाल तापमान 30 तर किमान 16 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. अख्ख गाव करतंय गाजराची शेती, कमी कालावधीमध्ये लाखोंचं उत्पन्न Video विदर्भ नागपूरमधील कमाल  तापमानात 0.4 अंश सेल्सियसची वाढ होऊन ते 29.2 अशं सेल्सियस इतके होते. तर शहरातील किमान तापमान हे 11.4 अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले आहे. वर्ध्यात कमाल 29.2  तर किमान 12.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर अमरावतीमध्ये कमाल 31.4 तर किमान 13.7 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात