आसिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली, 15 मे : लाचखोर अधिकाऱ्यांचा आणखी एक प्रताप सांगलीमध्ये समोर आला आहे. विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना तब्बल 2 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. लाच अधिकाऱ्याच्या या प्रतापाची बातमी कळताच सांगलीकरांनी एकच जल्लोष केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विटा शहरातील एका ठेकेदाराकडे एका इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील रोख रक्कम 2 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडलेले आहे. (मुलगाच वडिलांच्या जीवावर उठला, 70 वर्षांच्या बापाची धारदार शस्त्राने वार करून हत्या, वाशिम हादरलं) तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून ही माहिती दिली होती. त्यानुसार या विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप पाटील यांनी आज मंगळवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई केली. दरम्यान, तीन महिन्यापूर्वी 10 मार्च रोजी विनायक औंधकर यांची विटा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. आल्या पासूनच त्यांनी शहरातील बांधकाम व्यवसायिकांना आर्थिक दृष्ट्या त्रास देणे सुरू केले असल्याच्या तक्रारी सुरू होत्या. (आधी अश्लिल VIDEO बनवला, मग केलं भयानक कांड; वाचून हादराच बसेल) सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून खानापूर रस्त्यावरील विश्रामगृहावर विटा पालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांची लाच लुचपत विभागाच्या मार्फत कसून चौकशी सुरू आहे. यात अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. कारवाईनंतर बांधकाम व्यवसायिक आणि नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.