जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli : ग्रुप तयार करून शोधला होता बंगला, पोलिसांनी सांगितला शहर हदरवणाऱ्या दरोड्याचा मास्टर प्लॅन

Sangli : ग्रुप तयार करून शोधला होता बंगला, पोलिसांनी सांगितला शहर हदरवणाऱ्या दरोड्याचा मास्टर प्लॅन

Sangli : ग्रुप तयार करून शोधला होता बंगला, पोलिसांनी सांगितला शहर हदरवणाऱ्या दरोड्याचा मास्टर प्लॅन

दरोडेखोर हे रेल्वेने सांगलीत आले. ग्रुप तयार करून बंगल्याची पाळत ठेवली आणि…

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

    सांगली, 17 जानेवारी : सांगली     शहरातील कर्नाळ रस्त्यावरील एका बंगल्यात पहाटे तीनच्या सुमारास टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्यातील आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर येथून अटक केली. दरोडेखोर हे रेल्वेने सांगलीत आले. ग्रुप तयार करून बंगल्याची पाळत ठेवली आणि दरोडा टाकल्याची माहिती समोर आली आहे.     संशयितांची आंतरराज्यीय  टोळी असून नऊ जणांचा सहभाग आहे. त्यांच्यावर छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओरिसा, राजस्थान या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांकडून दरोड्यातील पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित हे एकमेकांचे नातेवाईक आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.   अनिल उर्फ अन्या युवराज पिंपळे (वय ४९, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), तुकाराम भिमराव घोरवडे (वय ५४ रा. उंडे वस्ती मातापूर, ता. श्रीरामपूर ) आणि दाजी धनराज सोळंके (वय ३६ रा. हरसुल गायरान नं १ लासूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    23 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कर्नाळ रस्त्यावरील आशिष चिंचवाडे यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडला होता. चोरट्यांनी मागील बाजूस असलेल्या लोखंडी दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. घरातील आशिष यांच्यासह त्यांच्या आईला हत्याराचा धाक दाखवून अवघ्या काही मिनिटात घरातील तब्बल आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख दोन लाख असा ऐवज लंपास करून पोबारा केला होता. हात पाय बांधून दरोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करू नये याकरिता चोरट्यांनी घरात असणाऱ्या आशिष चिंचवाडे यांचे हात पाय बांधले होते. दरोडा टाकून जाताना परिसरातील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले होते. तसेच फिर्यादींनी सांगितल्यानुसार रेखाटलेल्या रेखाचित्राच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन पोलीस पथके जिल्ह्यासह परजिल्ह्यात देखील तातडीने रवाना करण्यात आली होती. कर्नाळ येथे पडलेला दरोडा अहमदनगर, औरंगाबाद व बाहेरच्या राज्यातील संशयित आरोपींनी केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने श्रीरामपूर आणि औरंगाबाद परिसरात छापे टाकून तिघांना ताब्यात घेतले. Sangli : बंगल्यातील सर्वांचे हातपाय बांधून घातला दरोडा, शस्त्राचा धाक दाखवून केली मोठी लूट सहा आरोपी अद्याप पसार त्यांच्याकडे चौकशी केली असता संशयित दाजी सोळंके याने नऊ जणांच्या टोळीने चिंचवाडे यांच्या घरावर दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी यापैकी तिघांना अटक केली. संशयित तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संशयितांकडून पोलिसांनी ९९ ग्रॅम वजनाचे पाच लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या गुन्ह्यातील अन्य सहा आरोपी अद्याप पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.   असा होता प्लॅन   संशयित हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. यातील एक संशयित हा नुकताच कारागृहातून बाहेर आला आहे. सारे एकत्रितपणे नियोजन करून रेल्वेने सांगलीत आले. त्यांनी ग्रुप तयार करत टेहळणी करण्यास सुरुवात केली. चिंचवाडे यांच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी संशयित तिघांसह अन्य सहा जण हे सकाळी रेकी केली. या बंगल्याच्या आजूबाजूला शेती असल्याने पलायन करण्यास सोपे असल्याचे दिसून आले. दिवसभर त्यांनी कट रचला आणि पहाटेच्या सुमारात दरोडा टाकला.  

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: crime , Local18 , sangli
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात