मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sangli News: आईला वाचवण्यासाठी मुलीचा रौद्रावतार, हल्ला करणाऱ्या कोल्ह्याचा आवळला गळा, Video

Sangli News: आईला वाचवण्यासाठी मुलीचा रौद्रावतार, हल्ला करणाऱ्या कोल्ह्याचा आवळला गळा, Video

X
सांगली

सांगली जिल्ह्यातील कवठमहांकाळ येथील कविता चौरे हिने कोल्ह्याच्या हल्ल्यातून आईची सुटका केली.

सांगली जिल्ह्यातील कवठमहांकाळ येथील कविता चौरे हिने कोल्ह्याच्या हल्ल्यातून आईची सुटका केली.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Sangli, India

  स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी

  सांगली, 31 मार्च: आई आपल्या लेकरांना जीवापाड जपते आणि वाढवते. वृद्धापकाळी मुलंही आई-वडिलांचा आधार बनतात. सांगली जिल्ह्यातील एका मुलीचं सर्वत्र कौतुक होतंय. आईवर पिसाळलेल्या कोल्ह्यानं हल्ला केल्यानंतर कविता लिंगाप्पा चौरे हिने रौद्रावतार धारण करत कोल्ह्याचा गळा आवळला आणि कोल्ह्याच्या हल्ल्यातून आईचा जीव वाचवला. कवठेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी येथे ही घटना घडली.

  कोगनोळीत पिसाळलेल्या कोल्ह्याचा हल्ला

  कवठेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी परिसरात कोल्ह्यांचा वावर असतो. आटपाडकर वसतीवरील आई सुरेखा चौरे या मुलगी कविता यांच्यासह पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. तेव्हा अचानक पिसाळलेल्या कोल्ह्याने सुरेखा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. कोल्हा आईचे लचके तोडत असल्याचे पाहून मुलीने थेट कोल्ह्यावर झडप घातली आणि त्याचा गळा आवळला.

  आईची सुखरूप सुटका

  कविता हिने कोल्ह्याच्या हल्ल्यातून आईला वाचवले. आईने कोल्ह्याच्या तोंडातील हात काढून त्याच्यावर दगड, काठीने हल्ला केला. दोघींचे रौद्र रूप पाहून कोल्ह्याने तेथून पळ काढला. मात्र, आईला वाचवण्यासाठी आक्रमक झालेल्या कविताच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

  इंजिनिअर महिलेनं नोकरी सोडून गोळा केल्या टाकाऊ वस्तू, आता देशभर करतायत सुंदर वस्तूंची विक्री, Video

  कोगनोळी परिसरात भीतीचे वातावरण

  मी झाल्या होत्या. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना सांगलीतील सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, कोगनोळी परिसरात कोल्ह्यांचा वावर वाढला आहे. त्यातच मानवी वसतीत घुसून कोल्ह्याने महिलेवर हल्ला केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. कोल्ह्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

  First published:
  top videos

   Tags: Local18, Saluting Bravehearts, Sangli, Sangli news