जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Success Story : अबब! तब्बल पाऊण किलोचा कांदा! विश्वास बसत नसेल तर पाहा Video

Success Story : अबब! तब्बल पाऊण किलोचा कांदा! विश्वास बसत नसेल तर पाहा Video

Success Story : अबब! तब्बल पाऊण किलोचा कांदा! विश्वास बसत नसेल तर पाहा Video

Success Story : तुम्ही आत्तापर्यंत जास्तीत जास्त 100 ग्रॅम वजनाचा कांदा पाहिला असेल. पण, या कांद्यानं सर्वच विक्रम मोडले आहेत.

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

    स्वप्नील एरोंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 28 फेब्रुवारी : राज्यात कांद्याचे दर सध्या मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. कांद्याला अगदीच कमी किंमत मिळत असल्याचं नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. त्यांनी सोमवारी कांद्याचे लिलाव बंद पाडत आंदोलन केलं. त्याचवेळी राज्याच्या दुसऱ्या भागात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यानं चक्क पाऊन किलो वजनाचा कांदा पिकवला आहे. हा बाहुबलीच्या आकाराचा कांदा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केलीय. कसा आहे कांदा? सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील  ब्रह्मनाळ हनुमंत शिरगावे या शेतकऱ्यानं या कांद्याची लागवड केलीय. तुम्ही आत्तापर्यंत जास्तीत जास्त 100 ग्रॅम वजनाचा कांदा पाहिला असेल. पण, हनुमंतराव यांच्या शेतामधील कांद्यानं सर्वच विक्रम मोडले आहेत.हनुमंतरावांनी ऊसात आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली होती. त्यामुळे ऊसासोबतच कांद्यालाही मुबलक खतपाणी मिळत गेले. Success Story: वर्ध्यात बहरली ‘ड्रॅगन फ्रुट’ची शेती, शेतकरी घेतोय लाखोंचे उत्पन्न, Video ऊसाच्या भरणीसाठी त्यांनी कांदा काढायला सुरुवात केली. सुरुवातीला 10-12 मोठे कांदे निघाले. त्यानंतर सरसकट याच प्रकारचे वजनदार कांदे निघू लागले. गेली अनेक वर्ष कांदा पिकवणाऱ्या शिरगावे यांच्यासाठी ही नवी बाब होती. त्यांनी या कांद्याचं वजन केलं. त्यावेळी प्रत्येक कांद्याचे सरासरी वजन चक्क 750 ते 800 ग्रॅम इतके भरले. त्यांच्या कांद्याचा फड पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केलीय. खर्चही निघेना, कांदा उत्पादकांच्या डोळ्यात ‘अश्रू’, शेतकऱ्यांचा भावूक सवाल Video शिरगावे यांनी सांगितले की, लावणीसाठी बाजारपेठेतून नेहमीचे कांद्याचे रोप आणले होते. उसासोबतच दोनवेळा अळवणी केली. ह्युमिक, फुलविक, सिव्हिडची दोनवेळा फवारणी केली. ऊसासाठी केलेला हा प्रयोग कांद्यासाठीही लागू पडला. शेतकरी नेहमीच कोणता ना कोणता प्रयोग आपल्या शेतामध्ये करतच असतो आंतरपिकाच्या माध्यमातून  केलेल्या या कांद्याच्या लागवडीमुळे शिरगावे यांचं सर्वत्र  कौतुक होत आहे. या मालाला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात