सांगली, 10 डिसेंबर : एसटी बसमधील प्रवाशांना लुटणारी आंतरराज्य महिलांच्या टोळीचा सांगलीच्या विटा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आर. ईश्वरी (वय 28) आणि एम.दिपा (वय 22, रा. दोघीही रा. टूमकूर, कर्नाटक, सध्या रा. तासवडे, ता. कराड) या महिलांना अटक केली. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील तब्बल 9 लाख 51 हजार 350 रुपये किंमतीचे 179.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या महिलांसोबत आणखी काही महिला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या महिन्यात 26 नोव्हेंबर रोजी विटा पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन प्रवाशी महिलांना अज्ञात चोरट्यांनी लुटले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील किणी वाठार येथील नीता सोमनाथ निकम या सकाळी कराड बसस्थानकावरून गुहागर ते तुळजापूर एसटी मधून प्रवास करीत होत्या. यावेळी नीता निकम यांच्या बॅगेतील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती.
हे ही वाचा : मुंबईत मुलानेच केली प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या; मृतदेह बॉक्समध्ये भरून जंगलात फेकला, धक्कादायक कारण समोर
याच दिवशी गुहागर ते तुळजापूर एसटी बसमधून सोलापूर जिल्ह्यातील पिलीव येथील बायडा अनिल पाटणकर ही वृद्ध महिला प्रवास करत होती. यावेळी या महिलेची दागिन्यांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती.
विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पथकाने 7 डिसेंबर रोजी काही महिलांना विटा बस स्थानकावर संशयितरित्या वावरताना ताब्यात घेतले होते. या महिलांनी चोरलेले सोन्याचे दागिने तासवडे टोलनाका (ता. कराड) येथील राहत असलेल्या भाड्याच्या घरात ठेवल्याची कबुली दिली.
हे ही वाचा : दिड वर्षांच्या दरक्शाला एकट सोडणं जीवावर बेतलं, खेळताना चौथ्या मजल्यावरून थेट खाली पडली अन्
त्यावरून त्यांच्याकडून 5 तोळे 5 ग्रॅमचे सोन्याचे गंठण, 5 तोळे सोन्याचा हार, 1 तोळे वजनाचे झुमके व टॉप्स, 7 ग्रॅमच्या लहान मुलीच्या दोन बांगडया, 6 ग्रॅमची गणपतीचे पेंडन्ट असलेली सोनसाखळी आणि सोन्याच्या 3 अंगठ्या असा एकूण 9 लाख 51 हजार 350 किंमतीचे 179.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold robbery, Robbery Case, Sangli, Sangli (City/Town/Village), Sangli news