जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli Medical officer attack : धक्कादायक! शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Sangli Medical officer attack : धक्कादायक! शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Sangli Medical officer attack : धक्कादायक! शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

सांगली जिल्हा शासकीय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टरांचा हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • -MIN READ Sangli Miraj Kupwad,Sangli,Maharashtra
  • Last Updated :

सांगली, 27 डिसेंबर : सांगली जिल्हा शासकीय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टरांचा हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयामध्ये रुग्णावर उपचार करून घरी गेल्यावर डॉक्टर नंदकिशोर गायकवाड यांना हा हृदयविकाराचा झटका आला. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

डॉक्टर नंदकिशोर गायकवाड हे शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ आणि वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून सेवा बजावत होते. आज सकाळी डॉक्टर गायकवाड हे  रुग्णालयामध्ये आले होते. त्यानंतर उपचार आणि शस्त्रक्रिया करून ते नाष्टा करण्यासाठी घरी गेले होते. घरी नाष्टा करत असताना अचानकपणे त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलं आणि त्यांना यावेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  हिवाळ्यातील टॉन्सिलच्या त्रासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, बनू शकते कॅन्सरचे कारण

डॉक्टर गायकवाड हे अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे आणि मनमिळावू डॉक्टर म्हणून परिचित होते,स्त्री रोग तज्ञ म्हणून शासकीय रुग्णालयामध्य ते सेवा बजावत होते.तसेच वैद्यकीय अधीक्षक म्हणून देखील त्यांच्यावर जबाबदारी होती. गायकवाड यांचे वय 46 होते, त्यांच्या या मृत्यूच्या घटनेने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर

भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 29 वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर 5 जानेवारी 2023 ते 8 जानेवारी 2023 संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असं आवाहन भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष केतन शहा यांनी केले आहे.

हे ही वाचा :  उत्तम झोप आणि शांत मेंदू हवाय? मग तुम्हाला हे 5 प्रेशर पॉइंट्स माहिती हवेच

या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओंठ, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यातील विकृती, चिकटलेली हाताची बोटे, फुगलेले गाल अश्या प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत. कोविड प्रोटोकॉल मुळे यावर्षी चेहऱ्यावरील व्रण व डाग यावर शस्त्रक्रिया होणार नाहीत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात