सांगली, 30 जून : स्वयंपाक करणे हे मुलगा आणि मुलगी दोघांचंही काम आहे. ते दोघांनाही जमलं पाहिजे. विशेषत: मुलांनाही स्वयंपाक आला पाहिजे हा प्रयत्न आता शाळापातळीपासूनच सुरू झालाय. सांगली जिल्ह्यातल्या कुलाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेनं याच उद्देशानं ‘माझी भाकरी’ हा उपक्रम सुरू केलाय. कशी झाली सुरुवात? सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातलं कुलाळवाडी हे गाव ऊसतोड मजुरांसाठी प्रसिद्ध आबे. वर्षातील सहा महिने या गावातील कामगार ऊसतोडणीसाठी परगावी जातात. त्यांच्या मुलांना गावातच राहावं लागतं. त्यावेळी मुलांच्या जेवणाची मोठी अडचण असते. ही अडचण ओळखून जिल्हा परिषदेचे शिक्षक भक्तराज गर्जे यांनी हा उपक्रम सुरू केला. ‘मुलांना भाकरी बनवता यावी यासाठी शाळेकडून गेल्या आठ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही तिसरी ते आठवीच्या विद्यार्थींची स्पर्धा घेतली.या स्पर्धेत 80 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी उत्तम भाकरी थापणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आलं. शाळेच्या प्रयत्नामुळे मुलांना इतर स्वयंपाक देखील येऊ लागलाय. असं गर्जे यांनी सांगितलं. व्हिसा नाकारला पण सोडली नाही जिद्द, सांगलीची मुलगी सांभाळणार कॅनडाची अन्नसुरक्षा 2016 साली शाळेत पहिल्यांदा भाकरी बनवण्याचा स्पर्धा झाली. त्यावेळी मुलांना आपण भाकरी कशी बनवणार हा प्रश्न पडला होता. त्यांना लाजही वाटत असे. आई-वडील भाकरी बनवण्यासाठी पीठ द्यायला नकार देत. त्यावेळी गर्जे सरांनी मुलांना शेणापासून गोवऱ्या थापण्याचा मार्ग सांगितला. गोवऱ्या थापण्याचा सराव झाल्यानंतर भाकरी बनवणंही सोपं झालं. मुलांना स्वयंपाक येऊ लागल्याचा परिणाम आता पटसंख्येवरही झालाय. शाळेची पटसंख्या 80 वरुन 250 पर्यंत पोहचली आहे. त्यामध्ये 100 मुलं आणि 150 मुलींचा समावेश आहे. मुलांना स्वयंपाक येत असल्यानं त्यांचं स्थलांतर थांबलं आहे, असं गर्जे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.