स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 29 एप्रिल: सध्या आयपीएल क्रिटेक स्पर्धांची संपूर्ण देशात धूम सुरु आहे. या सामन्यांवेळी दाखविण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये जुगाराला चालना देण्याच्या जाहिराती अभिनेत्यांकडून होताना दिसत आहेत. त्यामुळे देशात वाढलेल्या बेरोजगारीला रोखण्यासाठी मटका बुकींना अधिकृत परवानगी देऊन तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करत डोक्याला मुंडावळ्या बांधून अनोखे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बेरोजगारीमुळे तरुण व्यसनांच्या आहारी देशात सध्या बेरोजगारांची संख्या लक्षणीय आहे. अनेकांना रोजगार मिळत नसल्याने तरुण नशेच्या आहारी जात आहेत. नशेबाजीतून अनेक गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता असते. सदरचे गुन्हे रोखायचे असतील तर शासनाने ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी करत राष्ट्रविकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
मोबाईल गेमला परवानगी मग जुगार का नको? संपूर्ण महाराष्ट्रात मोबाईलवरून जंगली रमी, लुडो गेम, ड्रीम इलेव्हन सर्कल, तीन पत्ती याचा मोठा गवगवा केला जात आहे. अनेक चित्रपट अभिनेते, खेळाडू याची जाहिरात करताना दिसत आहेत. राज्य सरकार जर अशा ऑनलाईन जुगाराला परवानगी देत असेल तर बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व मटका बुकींना मटका चालविण्यासाठी अधिकृत परवानगी द्यावी, बुकींसाठी काम करणाऱ्या तरुणांना शासनाने मानधन द्यावे, शासनाने या बुकी मालकांकडून मद्य विक्री सारखे कर वसूल करावेत, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. 1 रुपयामध्ये मिळणार नोकरी, मुंबईच्या तरुणाने तयार केलं खास APP मटक्याला परवानगी द्या अन्यथा आंदोलन लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानासमोर मटका खेळों आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी प्रशांत सदामते, आमोस मोरे, सुधाकर गायकवाड, नीलम मोहिते, संजय लोखंडे, बाळू केंगार यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.