मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जयंत पाटील यांच्या पुत्राचीही राजकारणात एन्ट्री, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अधिकृत प्रवेश

जयंत पाटील यांच्या पुत्राचीही राजकारणात एन्ट्री, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अधिकृत प्रवेश

जयंत पाटील यांच्या पुत्राचीही राजकारणात एन्ट्री

जयंत पाटील यांच्या पुत्राचीही राजकारणात एन्ट्री

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी प्रतिक जयंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli, India

असिफ मुरसल, सांगली

सांगली, 6 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या मुलानेही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. प्रतीक पाटील यांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. हा विजय म्हणजे प्रतीक पाटील यांची राजकारणात अधिकृत एन्ट्री झाल्याचे बोलले जात आहे.

जयंत पाटील यांच्याप्रमाणेच प्रतिक पाटील यांचा राजकारणात प्रवेश

लोकनेते राजारामबापू पाटील हे वाळवा सहकारी साखर कारखाना स्थापनेच्या वेळी संचालक होते. दरम्यान, राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर वाळवा सहकारी साखर कारखान्याचे नामांतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना असे करण्यात आले. आमदार जयंत पाटील यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून झाला होता. 10 वर्षे ते अध्यक्ष राहीले. तसेच आजतागायत संचालक म्हणून होते. येत्या काळात कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होणार आहे, हे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. आमदार जयंत पाटील यांनी नव्या पिढीला संधी देताना चिरंजीव प्रतिक पाटील यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून केला आहे.

वाचा  - 25 वर्षांनंतर भाजपने ब्राह्मण उमेदवार का बदलला? कसबा मतदारसंघाची Inside Story

राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयं पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांचा अलीकडेच शाही विवाह पार पडला होता. या शाही विवाहाची राज्यभर एकच चर्चा झाली होती. या विवाह सोहळ्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिले होते. दरम्यान, लग्नात सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करून आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने हे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शनच असल्याचे बोलेले गेले होते. त्यानंतर आता प्रतीक पाटलांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

मागील काही काळापासून प्रतीक पाटलांच्या राजकीय लाँचिगसाठी जयंत पाटील तयारी करत असताना दिसून येत होते. यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या संवाद यात्रेत प्रतीक पाटील यांचे डिजिटल पोस्टर असो किंवा पक्षाच्या विविध मोर्चात त्यांचा सहभाग, त्यांच्या शाही विवाहात सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती ही त्यांच्या राजकीय प्रवेशाची चुणूकच असल्याचे दिसून आले होते.

First published:

Tags: Jayant patil, Sangli