मराठी बातम्या /बातम्या /पुणे /25 वर्षांनंतर भाजपने ब्राह्मण उमेदवार का बदलला? कसबा मतदारसंघाची Inside Story

25 वर्षांनंतर भाजपने ब्राह्मण उमेदवार का बदलला? कसबा मतदारसंघाची Inside Story

कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीला अधिकृत सुरूवात झाली आहे. 25 वर्षानंतर या मतदारसंघात ब्राह्मण नेतृत्व नसेल. भाजपने घेतलेल्या या निर्णयामागे काही समीकरणंही आहेत.

कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीला अधिकृत सुरूवात झाली आहे. 25 वर्षानंतर या मतदारसंघात ब्राह्मण नेतृत्व नसेल. भाजपने घेतलेल्या या निर्णयामागे काही समीकरणंही आहेत.

कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीला अधिकृत सुरूवात झाली आहे. 25 वर्षानंतर या मतदारसंघात ब्राह्मण नेतृत्व नसेल. भाजपने घेतलेल्या या निर्णयामागे काही समीकरणंही आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 6 फेब्रुवारी : कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीला अधिकृत सुरूवात झाली आहे. भाजपच्या हेमंत रासने आणि काँग्रेसच्या वतीने रवींद्र धंगेकर यांचा अर्ज भरण्यात आला आहे. हा अर्ज भरताना दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन ही करण्यात आलं. बिनविरोध निवडणूक होईल असं वाटत असतानाच काँग्रेसने प्रदेशाच्या मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शकातीप्रदर्शन केलं. भाजपने ही शीर्षस्थ नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरून जोरदार वातावरण निर्मिती केली आहे, त्यामुळे सहानुभुतीच्या लाटेवर होणारी निवडणूक अचानक चुरशीच्या वाटेवर निघाली आहे.

मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या वतीने हेमंत रासने तर काँग्रेसच्या वतीने रविंद्र धंगेकर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. यासोबतच संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी , ब्राह्मण महासंघ ही उमेदवारी दाखल करणार आहेत.

काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर हे बंडखोरी करतील असं चित्र आहे, असं जरी असलं तरी थेट लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच असेल हे स्पष्ट झालंय. टिळक कुटुंबात उमेदवारी न दिल्याने कुटुंबिय नाराज आहेत, त्यामुळे ते रासने यांचा अर्ज भरताना ही अनुपस्थित राहिले.

उमेदवाराचा अर्ज भरायची वेळ ठरली , शक्तीप्रदर्शनाची तयारी झाली तरी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्याचा गोंधळ अगदी सकाळपर्यत मिटत नव्हता, अखेर उमेदवारी घोषित झाली आणि अर्ज ही भरला गेला, त्यानंतरच उमेदवारांनी हुश्श केलंय.

ब्राम्हण उमेदवार नाही

ब्राह्मण उमेदवार न दिल्याच्या निषेधार्थ आज सकाळी कसब्यात अनेक ठिकाणी पाट्या लावण्यात आल्या होत्या आणि भाजपला मतदान का करायचं? असा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र कसबा विधानसभेत ओबीसी मराठा आणि मुस्लीम यांच्या मतांची टक्केवारी तब्बल 66 टक्के इतकी आहे आणि याचाच विचार करत भाजपने ओबीसी चेहरा देण्याचा निर्णय घेतलाय. तर काँग्रेसने मराठा उमेदवार दिलाय. महत्वाची नोंद म्हणजे गेली 25 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व ब्राह्मण आमदाराने केलंय.

कसबा पेठेचं जातीय समिकरण

मराठा : 23.85 %

ओबीसी : 31.45 %

मुस्लीम : 10.5%

दलित : 13%

ब्राम्हण : 13.25%

इतर: 7.1%

एकतर्फी सहानुभूतीच्या लाटेवर निवडणुक होईल असं वाटत असतानाच कसब्यातलं वातावरण झपाट्याने बदललंय. भाजपने अंकगणितावर जोर देत टिळक कुटुंबाच्या बाहेरचा उमेदवार दिलाय, तर दांडगा जनसंपर्क असलेला धंगेकरांसारखा उमेदवार काँग्रेसने रिंगणात उतरवलाय. हेमंत रासनेंसारखा गणेश मंडळाचा ओबीसी कार्यकर्ता भाजपने चेहरा म्हणून समोर आणलाय, यामुळे यंदाच्या पोटनिवडणुकीत यापूर्वीच्या निवडणुकांचे आडाखे पुन्हा खरे ठरतील का? हे पाहण रंजक असणार आहे.

First published:

Tags: BJP, Pune