सांगली 21 डिसेंबर : जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली फॉरेन रिटर्न तरुणी महाराष्ट्रात येऊन सरपंच बनली आहे. यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही सांगली जिल्ह्यातील ‘वड्डी’ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी निवडून आली आहे. या निवडणुकीत शिंदे यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला असून सर्व जागेवर उमेदवार निवडून आले आहेत. यातफॉरेन रिटर्न उच्चशिक्षित उमेदवार यशोधरा राजे सरपंचपदी निवडून आल्या आहेत. दोन्ही बहिणींची UPSC मध्ये कमाल, एकीने तर लाखो रुपयांची सोडली नोकरी; आता दोन्ही IAS सांगली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार लोकवस्तीचं वड्डी छोटंसं गाव आहे. मिरज शहरालगत असणारं हे गाव आहे. या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विकासाचा मुद्दा उपस्थित करत जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली तरुणी यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही निवडणुकीत सरपंचपदाची उमेदवार झाली. परदेशाप्रमाणे शुद्ध पिण्याचं पाणी, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा गावकऱ्यांपर्यंत पोहोचत का नाहीत ? या विचारातून या मुलीने थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली फॉरेन रिटर्न तरुणी महाराष्ट्रात येऊन सरपंच बनली आहे. यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही सांगली जिल्ह्यातील 'वड्डी' ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी निवडून आली आहे pic.twitter.com/fCJ4RDboqK
— News18Lokmat (@News18lokmat) December 21, 2022
शाळेत शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी असताना सगळ्यात मिळून एकच कॉमन टॉयलेट का? विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार ते का नाहीत ? परदेशासारखे शाळेत किंवा काही विशिष्ट ठिकाणी सॅनेटरी पॅडचे व्हेंडिंग मशीन्स आपल्या गावखेड्यात का नाहीत? असे प्रश्न घेवून तिने निवडणुकीचा प्रचार केला.
जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली फॉरेन रिटर्न तरुणी महाराष्ट्रात येऊन सरपंच बनली आहे. यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही सांगली जिल्ह्यातील 'वड्डी' ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी निवडून आली आहे pic.twitter.com/fCJ4RDboqK
— News18Lokmat (@News18lokmat) December 21, 2022
यशोधराने परदेशात पाहिला तसाच गाव समाज माझ्या गावात बनला पाहिजे हे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवली. विकासाचं मॉडेल गावागावात विकसित व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा ती व्यक्त करताना दिसते. जळगाव : चर्चा तर होणारचना भाऊ! भल्याभल्यांचा बँड वाजवत बँडवाला बनला सरपंच, पॅनलही केलं विजयी यशोधरा राजे शिंदे हिचे अमेरिकेतील जॉर्जिया याठिकाणी न्यू विजन युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस चौथ्या वर्षाचे शिक्षण सुरू आहे. मात्र, यशोधरा ही शिक्षण सोडून थेट गावाच्या विकासासाठी राजकारणात उतरली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या निमित्ताने सरपंच पदासाठी यशोधरा राजे हिने उमेदवारी दाखल करत प्रचार सुरू केला आणि यात तिला यशही आलं. विदेशातील उच्च शिक्षण सोडून गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन परतलेली यशोधरा राजे ही नव्या पिढीला राजकारणात येण्यासाठी आदर्श ठरत आहे.