सांगली, 20 डिसेंबर : राज्यात आज 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. निकालानंतर विजयी उमेदवाराचं जंगी स्वागत होत आहे. मात्र, हे स्वागत करताना एक नवनिर्वाचित सरपंच जखमी झाल्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील खटाव ग्रामपंचायतचे भाजपचे नूतन सरपंच रावसाहेब बेडगे एका घटनेत भाजले आहेत. निवडून आल्यानंतर महिला औक्षण करताना कार्यकर्त्यांनी अंगावर गुलाल टाकला. या गुलाबाचा आगीश संपर्क आल्याने भडका उडाल्याने रावसाहेब बेडगे यांच्यासहीत दोनजण जखमी झाले आहे. सर्वांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काय आहे प्रकार?
सांगली जिल्ह्यातील खटाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे रावसाहेब बेडगे हे सरपंच पदाच्या निवडणुकीत निवडून आले. नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांची जल्लोष केला. विजयी रावसाहेब बेडगे यांना महिला औक्षण करत असताना कार्यकर्त्यांनी चुकून गुलाल अंगावर टाकला. आगीचा गुलालाशी संपर्क आल्याने मोठा भडका उडाला. या भडक्यात नूतन सरपंच रावसाहेब बेडगे यांच्यासह सुरेश परीट, अजित खटावकर हे तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरजेच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे.
सांगली जिल्हा (एकूण 447/447ग्रामपंचायत)
राष्ट्रवादी :- 154
भाजप। : - 105
काँग्रेस : - 61
शिंदे गट : 30
ठाकरे गट : 3
स्थानिक आघाडी : - 87
घोरपडे गट (कवठेमहांकाळ) - 7
वाचा - बुलढाण्यात एकाच सरपंचावर तीन पक्षाचा दावा; तिघांनी सत्कार केल्याने गावकरीही हैराण
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एक
सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत आलेल्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रथम क्रमांकाचा पक्ष झालेला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून तिसऱ्या क्रमांकावर स्थानिक आघाडी असून चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या शिंदे गटाने उल्लेखनीय कामगिरी केली असून ठाकरे गट मात्र शेवटच्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे. आतापर्यंत 447 ग्रामपंचायती पैकी 447 ग्रामपंचायतीचा निकाल लागलेला आहे. उर्वरित ग्रामपंचायतीचा निकाल येणे बाकी आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला यश मिळालं आहे. तर पालकमंत्री सुरेश खाडे यांचा भाजप पक्ष दुसऱ्या क्रमांकावर जरी असला तरी त्यांच्या मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपने सर्वाधिक जागा मिळवलेले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस 154 ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाला आहे तर भाजप 105 ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवली आहे. स्थानिक आघाड्यांच्या पॅनल नी 87 ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. तर काँग्रेस 61 ठिकाणी विजयी झाले आहे. शिंदे गट 30 ठिकाणी सत्ता मिळवण्यात यशस्वी झाला आहे. मात्र सांगली जिल्ह्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गट 3 हा शेवटच्या स्थानावर फेकला गेलेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram panchayat, Sangli